swt2517.jpg
94298
सावंतवाडी : पत्रकार परिषदेत बोलताना आमदार दीपक केसरकर. बाजूला जिल्हाप्रमुख संजीव परब, तालुकाप्रमुख दिनेश गावडे, शहरप्रमुख बाबू कुडतरकर व अन्य पदाधिकारी.
हत्तींना गडचिरोलीत पाठवल्यास स्वागतच
दीपक केसरकरः ‘वनतारा’बाबत झालेल्या आरोपांनाही उत्तर
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २५ः हत्तींना गडचिरोलीत पाठवण्यासाठी गोवा पुढाकार घेत असेल, तर ते स्वागतार्हच आहे, अशी भूमिका आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत मांडली.
त्यांच्या निवासस्थानी झालेल्या या पत्रकार परिषदेवेळी जिल्हाप्रमुख संजू परब, तालुकाप्रमुख दिनेश गावडे, शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर आदी उपस्थित होते.
श्री. केसरकर म्हणाले, ‘‘दोडामार्ग तालुक्यात थैमान घालणाऱ्या हत्तींमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबवण्यासाठी हत्तींना ‘वनतारा’मध्ये पाठवण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. ‘वनतारा’मध्ये हत्ती पाठवला म्हणजे त्याची विक्री केली जाते, ही विरोधकांची टीका चुकीची आहे. ‘वनतारा’मध्ये हत्तींची योग्य ती काळजी घेतली जाते, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. हत्ती बाधित शेतकऱ्यांचे दुःख मी समजू शकतो; हत्तींवर नियंत्रण ठेवण्याची यंत्रणा आपल्याकडे नाही. शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. गोव्याने ‘ओमकार’ हत्तीला गडचिरोलीत सोडण्यासंदर्भात पावले उचलली, हे योग्यच आहे. त्याला माझा विरोध नाही. याआधी आम्ही सुद्धा तसा प्रयत्न कर्नाटक सरकारसोबत केला होता, परंतु कर्नाटक सरकार येथील हत्तींना पुन्हा आपल्याकडे घेण्यास तयार झाले नाही. गोव्याने तसा प्रस्ताव पाठविला तर आनंदच आहे. शेतकऱ्यांना त्रास होऊ नये, हीच आमची भूमिका आहे.
अमली पदार्थांबाबत विचारले असता केसरकर म्हणाले, ‘‘अमली पदार्थांमुळे युवा पिढी बरबाद होत आहे. यावर कारवाई होण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक, पोलिस निरीक्षकांशी मी बोललो आहे. यापूर्वीही तशी मागणी केली होती. अशा गोष्टी जिल्ह्यात येऊ नयेत, यासाठी कारवाई केली जाईल, तरच पुढची पिढी व्यसनाधीन होणार नाही. सावंतवाडी शहरातली खड्डे तत्काळ बुजविण्यासाठी प्रशासनाला आदेश देईन; मात्र इतर ठिकाणांपेक्षा सावंतवाडीत चांगली परिस्थिती आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.