कोकण

सांगिर्डेतील वारकरी भजनाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

CD

९४४५६

सांगिर्डेतील वारकरी भजनाला
रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २६ ः शहरातील सांगिर्डे येथे सुरू असलेल्या नवरात्र उत्सवात खवणे-पागेरेवाडी येथील श्री देव ब्राह्मण प्रासादिक भजन मंडळाने वारकरी भजन सादर केले. याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वालावलकर कुटुंबीय व ड्रीम स्क्वेअर रेसिडेन्सीच्या वतीने देवीची मूर्ती प्रतिष्ठापना करून उत्सवाला प्रारंभ झाला. बजाज शोरूमच्या मागे ड्रीम स्क्वेअर रेसिडेन्सी परिसरात हा उत्सव होत असून नऊ दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या (ता. २७) रात्री ९ वाजता ‘होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम होईल. रविवारी (ता. २८) मोठ्या मुलांचे रेकॉर्ड डान्स, सोमवारपासून पुढे दररोज रात्री ९ वाजता गरबा रास होणार आहे. मंगळवारी कन्यापूजन व ओटी भरणे, बुधवारी दुपारी महाप्रसाद तसेच २ ऑक्टोबरपर्यंत दररोज कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी वारकरी भजन मंडळाचे प्रमुख काशिनाथ परब यांचा सत्कार ड्रीम स्क्वेअर रेसिडेन्सी व वालावलकर कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आला. हा सत्कार संदीप धामापूरकर व महेश प्रभू यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाला संतोष वालावलकर, समीर वालावलकर, रूपेश पाटकर, ओंकार प्रभू, योगिता वालावलकर, सीमा शिंदे, सुप्रिया धामापूरकर, तेजल वालावलकर, सौ. परब, अशोक परब यांसह रेसिडेन्सीचे सदस्य उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shegaon Alert : दिल्ली हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शेगावच्या श्री संस्थानमध्ये सुरक्षा वाढवली!

Navi Mumbai News: नवी मुंबईत वाहतुकीत बदल! 'या' भागात नो पार्किंग; नवे नियम लागू

Delhi Red Fort Blast: विमा पॉलिसीमध्ये दहशतवादी हल्ल्यांचा समावेश असतो का?

Mumbai Local: मुंबई लोकलच्या 'या' मार्गावर धावणाऱ्या १५ डब्यांच्या ट्रेनची संख्या वाढणार! नवीन वेळापत्रक कधी जाहीर होणार?

Maldives Airport: विमानतळ ठरेल समृद्धीचे प्रवेशद्वार; मोईझ्झू, भारताच्या सहकार्याने प्रकल्प पूर्ण

SCROLL FOR NEXT