-rat२६p२४.jpg-
२५N९४४९९
राजापूर ः कुणबी एल्गार मेळाव्याला उपस्थित जनसमुदाय.
(छाया ः राजेश खांबल, राजापूर)
----
आरक्षणात घुसखोरी खपवून घेणार नाही
अनिल नवगणे ः मुंबईतील आंदोलनात ताकद दाखवणार
राजापुरात कुणबी एल्गार मेळावा---लोगो
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २६ ः कुणबी-ओबीसी असा कोणताही भेदभाव नाही. पुढील महिन्यामध्ये मुंबई येथील आझाद मैदानावर ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन होणार आहे. त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन मुंबई चक्काजाम करून ओबीसीसह कुणबी बांधवांची ताकद शासनाला दाखवूया, असे आवाहन कुणबी समाजोन्नती संघ मुंबईचे अध्यक्ष अनिल नवगणे यांनी केले. आमचा कोणाला विरोध नाही. आम्ही अधिकही मागत नाही; मात्र, जे आमचं आहे त्यामध्ये घुसखोरी खपवून घेणार नाही, असा सज्जड इशाराही शासनाला दिला.
कुणबी समाजोन्नती संघातर्फे पुढील महिन्यात मुंबई येथे ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन छेडले जाणार आहे. त्या अनुषंगाने कुणबी समाजबांधवांशी संवाद साधण्यासाठी आज कुणबी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कुणबी समाजोन्नती संघ ग्रामीण शाखा राजापूरचे अध्यक्ष दीपक नागले, कुणबी संघाचे अरविंद डाफळे, राजापूर शाखेचे अध्यक्ष शिवाजी तेरवणकर, ओबीसी जनमोर्चाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर, ओबीसी जनमोर्चाचे राजापूरचे अध्यक्ष महेश शिवलकर, अॅड. शशिकांत सुतार, प्रकाश मांडवकर, रवींद्र नागरेकर, मधुकर तोरस्कर, मानसी दिवटे, सत्यवान कणेरी, चंद्रकांत जानस्कर, अॅड. महेंद्र मांडवकर, नरेश शेलार आदी उपस्थित होते.
नवगणे म्हणाले, कुणबी नावाखाली मराठा समाज ओबीसी आरक्षणामध्ये घुसत आहे. आज एका भागापुरते झालेल्या शासननिर्णयाची व्याप्ती भविष्यामध्ये राज्यभर होऊ शकते. त्यामुळे शांत न बसता आतापासून संघर्षाचा लढा उभारणे गरजेचे आहे. न्यायालयीन लढ्यासोबत रस्त्यावरचीही लढाई लढणे गरजेचे आहे. भावी पिढीच्या भविष्यासाठी होणाऱ्या या लढ्यामध्ये सर्वांनी लाखोंच्या संख्येने सहभागी व्हा.
चौकट
ओबीसी आरक्षण संपवण्याचे षडयंत्र
ओबीसी जनमोर्चाचे कार्याध्यक्ष बावकर यांनी ओबीसी आरक्षण आणि त्याबाबत शासननिर्णय याचा आढावा घेताना कुणबी नावाखाली घुसण्याचा आणि त्यातून ओबीसी आरक्षण संपवण्याचे षडयंत्र सुरू असल्याचे स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.