-rat२६p३०.jpg-
२५N९४५५६
देवरूख ः एकदिवसीय साहित्य संमेलनात सहभागी साहित्यिक.
-----
देवरूख महाविद्यालयात साहित्य संमेलन
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. २६ ः देवरूख येथील आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात एक दिवसीय साहित्य संमेलन झाले. या संमेलनात तालुक्यातील पाच साहित्यिकांनी साहित्य वाचन केले. महाविद्यालयाच्या मराठी आणि ग्रंथालय विभागाकडून संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
संगमेश्वर तालुक्यात साहित्य निर्मिती करणाऱ्या लेखकांचा परिचय विद्यार्थ्यांना व्हावा आणि त्यांचे साहित्य त्यांच्याकडून ऐकता यावे या उद्देशाने साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनात महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ. वर्षा फाटक, देवरूख कोमसापचे अध्यक्ष दीपक लिंगायत, शिक्षक अमित पंडित, अॅड. समीर आठल्ये आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रा. सीमा शेट्ये यांनी सहभाग घेतला होता.
संमेलनाचे प्रास्ताविक करताना उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांनी अशा संमेलनाची गरज व्यक्त केली. अशा संमेलनांमधून साहित्यिकांना ऐकून भावी लेखक तयार होतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर साहित्य वाचन करण्यात आले. अमित पंडित यांनी विज्ञान कथेची पार्श्वभूमी सांगून स्वालिखित मानव-यंत्रमानव ही कथा सादर केली. अॅड. समीर आठल्ये यांनी त्यांच्या काव्य लेखनामागची भूमिका स्पष्ट करून त्यांच्या दोन कवितांचे वाचन केले. प्रा. सीमा शेट्ये यांनी त्यांचा पारितोषिक विजेता निबंध सादर केला. प्रा. वर्षा फाटक यांनी आपल्या राज्यस्तरीय पारितोषिक प्राप्त वेळ-अवेळ या कथेचे वाचन केले.