-rat२६p३४.jpg-
२५N९४५८०
डॉ. बारसू गणपत खडसे
---
डॉ. बारसू खडसे यांचे देहदान
दापोली, ता. २७ ः तालुक्यातील ज्येष्ठ रहिवासी व हाफकीन इन्स्टिट्यूट, मुंबईचे माजी संचालक डॉ. बारसू गणपत खडसे (वय ८५) यांचे निधन २५ सप्टेंबरला झाले. यांनी मृत्यूपश्चात देहदानाची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या इच्छेनुसार त्यांची मुलगी अर्चना दिनेश वराडे व कुटुंबीयांनी दापोली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजला पार्थिव देहदान केला.
या प्रक्रियेसाठी डॉ. नरेश पटवर्धन यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्या डॉ. चेतना गोरिवले यांच्याकडे पार्थिव सुपूर्द करण्यात आले. या वेळी सुनील गोरिवले, डॉ. मोहन नाले, डॉ. अलिशा वालापकर तसेच कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते. या देहदानामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांना शारीरशास्त्र विषयाचा अभ्यास करण्यास मोठी मदत होणार आहे. दापोली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजतर्फे खडसे कुटुंबीयांचे आभार मानण्यात आले.
---