-rat२६p३८.jpg-
२५N९४६०४
पावस ः कोळंबे-बागवाडी येथे अझोलाचे प्रात्यक्षिक दाखवताना कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी.
-----
कोळंबेत अझोला उत्पादनाचे प्रात्यक्षिक
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. २७ ः दापोली कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे येथे कार्यरत विद्यार्थ्यांच्या मृदासूत गटाने बागवाडी येथे अझोला उत्पादनाचे प्रात्यक्षिक दाखवले. या प्रात्यक्षिकात १२ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.
प्रात्यक्षिकादरम्यान शेतकऱ्यांना आझोला उत्पादनाची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. बाजारात उपलब्ध असलेल्या अझोला बेडमध्ये १५ किलो सुपीक माती पसरवण्यात आली. त्यानंतर २ किलो शेणखत व ३० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट १० लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करून बेडमध्ये ओतण्यात आले. पाण्याची पातळी सुमारे १२ सेंमी ठेवण्यात आली व ५०० ग्रॅम ताजे अझोला टाकण्यात आले. शेतकऱ्यांना अझोलाची पोषणमूल्ये, पशुखाद्यातील वापर, दूध उत्पादन वाढवण्यातील भूमिका तसेच कुक्कुटपालन व इतर जनावरांसाठी त्याचा उपयोग याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रात्यक्षिकावेळी प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राचे केंद्रप्रमुख डॉ. किरण मालशे, डॉ. नरेंद प्रसादे, कार्यक्रम अधिकारी डॉ. संतोष वानखेडे आदी उपस्थित होते.