कोकण

ई-पीकसाठी ई मुदतवाढ

CD

ई-पीक नोंदीसाठी
पुन्हा मुदतवाढ
सिंधुदुर्गनगरी : राज्यात काही ठिकाणी झालेल्या अतिवृष्टी आणि दुबार पेरणीमुळे काही शेतकरी ई-पीक नोंदणी करू शकले नाहीत. शेतकऱ्यांना नोंदणीस वंचित राहू नये म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ जाहीर केली आहे. ई-पीक पाहणी डीसीएस मोबाईल ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी स्वत:च्या मोबाईलवरून सातबारा उताऱ्यावरील खरीप पिकांची नोंदणी करणे आवश्यक आहे. सहायकांवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी स्वतः या पाहणीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कृषी समृद्धी योजनेंर्गत
अर्ज करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी ः कृषी समृध्दी योजनेंतर्गत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान २०२५-२६ अंतर्गत विविध घटकांसाठी लाभ दिला जात आहे. महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी या संकेस्थळावर अर्ज करून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे. या योजनेंतर्गत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान २०२५-२६ अंतर्गत शेतकऱ्यांना विविध घटकांसाठी अनुदान उपलब्ध आहे. या योजनेत क्षेत्र विस्तार, संरक्षित शेती, मधुमक्षिका पालन, यंत्रसामग्री खरेदी आणि फळपीक व्यवस्थापन यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी महाडीबीटी पोर्टल https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/Agrilogin/Agrilogin
वर अर्ज करावा. आवश्यक कागदपत्रांमध्ये सातबारा उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक, जात प्रमाणपत्र, हमीपत्र व चतु:सीमा नकाशा यांचा समावेश आहे.

सावंतवाडीत ३० ला
रिक्त पदे भरती
सावंतवाडी : जिल्हा कौशल्य विकास व श्री पंचम खेमराज महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (ता.३०) प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित केले आहे. कोब्रो ग्रुप प्रा. लि. (KOLBRO Group Pvt. Ltd.) गोवा येथे ५० रिक्त पदांसाठी भरती करत असून, सर्व्हेअर आणि टीम इनचार्ज या पदांसाठी आय.टी.आय., सिव्हिल डिप्लोमा किंवा पदवीधर पात्र आहेत. इच्छुक उमेदवारांनी ठराविक दिवशी शैक्षणिक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

माजगावसाठी
३० ला कॅम्प
सावंतवाडी ः छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत माजगाव येथे भूसंपादन मोबदला देण्यासाठी ६ ऑक्टोबरला कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. शिल्लक मोबदलाधारकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


फुले महामंडळातर्फे
विविध योजनांसाठी आवाहन
सिंधुदुर्गनगरी ः महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, जिल्हा कार्यालयामार्फत २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता पात्र लाभार्थ्यांकडून महामंडळ राबवीत असलेल्या विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा व्यवस्थापक महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ (मर्या). जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. यामध्ये ५० टक्के अनुदान योजना, बीज भांडवल योजना, थेट कर्ज योजना, एनएसएफडीसी व एनएसकेएफडीसी योजना यांचा समावेश आहे. अर्जासाठी आवश्यक पात्रता, कागदपत्रे आणि माहिती https://mpbcdc.maharashtra.gov.in किंवा https://mahadisha.in
या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सावंतवाडीत
कॅरम स्पर्धा
सावंतवाडी ः सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनच्या आयोजनाखाली कनिष्ठ गट जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा ५ ऑक्टोबरला सावंतवाडी येथे होणार आहे. १२, १४, १८ आणि २१ वर्षांखालील मुला-मुलींना सहभागी होण्याची संधी असून, राज्य मानांकन कॅरम स्पर्धेसाठी निवड होईल. नाव नोंदणीसाठी ३ ऑक्टोबरपर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सावंतवाडी येथे
आज गरबा नाईट
सावंतवाडी ःआरंभ सखी महिलांच्या ग्रुपच्या आयोजनाखाली नवरात्रोत्सवानिमित्त उद्या (ता. २७) सायंकाळी ७ ते १० वाजेपर्यंत गरबा नाईट होणार आहे. बेस्ट डान्सर, एनर्जेटिक परफॉर्मन्स, उत्कृष्ट कॉश्‍च्युम अशा विविध बक्षिसांचा समावेश आहे.

आचरा न्यू इंग्लिशचे
क्रीडा स्पर्धेत यश
आचरा ः न्यू इंग्लिश स्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज, आचरा यांनी तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले. ४००, २००, १०० मीटर, उंचउडी, गोळाफेक, ४×१०० रिले आणि इतर मैदानी स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे. मुख्याध्यापक अंकुशराव घुटूकडे आणि क्रीडा शिक्षक नीलेश मोहन सिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.

मालवण येथे
उद्या ‘शिवभूषण’
मालवण : शिवशंभो सामाजिक कला, क्रीडा मंडळ, फोंडाघाट आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘शिवभूषण’ या काव्याचे विशेष सादरीकरण सोहळा रविवारी (ता.२८) रात्री १० वाजता कुळदेव मंदिर, कुळाचीवाडी, फोंडाघाट येथे होणार आहे. कविवर्य भूषण यांनी रचलेल्या या काव्याचे छंदात्मक सादरीकरण येथील भूषण साटम करणार आहेत. संपर्कासाठी अशोक लाड, अक्षय धुरी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Red Alert : राज्यातील बावीस जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’

Rohit Pawar : ‘’मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना दिलेली प्रतिक्रिया बघता महाराष्ट्राला...’’ ; रोहित पवारांनी साधला निशाणा!

Finance Ministry New Address: अर्थ मंत्रालयाला नवे घर मिळणार, नॉर्थ ब्लॉकमधून बाहेर पडणार, 'या' भवनात नवा प्रवास सुरू करणार

Maharashtra Rain Alert : पुढील ५ दिवस धोक्याचे, पावसाचा जोर आणखी वाढणार; मान्सूनचा राज्यातील परतीचा प्रवास लांबला

IND vs SL Live: अभिषेक शर्माचा विक्रमांचा पाऊस! तिलक वर्मा, संजू सॅमसनची साथ; भारताच्या तगड्या धावा

SCROLL FOR NEXT