-rat२६p३९.jpg-
२५N९४६२३
महेश मालगुंडकर
-rat२६p४०.jpg-
२५N९४६२४
महेक रमजाने
----
‘दापोली’ महाविद्यालयाचे दुहेरी यश
दापोली, ता. २७ : दापोली एज्युकेशन सोसायटीच्या दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजने प्रतिष्ठित ५८व्या मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात दुहेरी यश संपादन केले आहे. महाविद्यालयातील एफवाय बीएससीची विद्यार्थिनी महेक रमजाने हिने मेहंदी स्पर्धेत तर टीवाय बीएस्सी (केमिस्ट्री) विद्यार्थी महेश मालगुंडकर याने मातीकाम स्पर्धेत उत्कृष्ट कलाकुसरीने कास्यपदक पटकावले. मुंबई विद्यापीठ फोर्ट येथील सर कोवसजी जहांगीर पदवीदान सभागृहात मेहंदी स्पर्धेची अंतिम फेरी झाली. स्पर्धेत विद्यापीठाच्या १२ झोनमधील ७७ स्पर्धकांमध्ये महेकने ‘अरेबिक फ्लोरल’ प्रकारातील नक्षीदार मेहंदी साकारत कांस्यपदकावर नाव कोरले. चर्चगेट येथील विद्यापीठ विद्यार्थी भवन येथे झालेल्या मातीकाम स्पर्धेत २९ स्पर्धकांमध्ये महेशने कल्पकतेचा व कलात्मक कौशल्याचा सुंदर आविष्कार घडवून कास्यपदक मिळवले.
---