rat२७p३.jpg-
P२५N९४६९६
रत्नागिरी : आदर्श शिक्षिका पुरस्कार स्नेहा साखळकर यांना प्रदान करताना शिल्पा पटवर्धन. सोबत आनंद देसाई, मनोज पाटणकर, सतीश शेवडे, डॉ. जोशी, डॉ. मकरंद साखळकर, सचिन वहाळकर. दुसऱ्या छायाचित्रात मालती जोशी आदर्श सेवक पुरस्कार सुरेश बेर्डे आणि तिसऱ्या छायाचित्रात मालतीबाई जोशी आदर्श कर्मचारी पुरस्कार गजानन लोंढे यांना देताना डॉ. मुकुंदराव जोशी.
कौशल्य अभ्यासक्रम, रिसर्च सेंटर सुरू करणार
शिल्पा पटवर्धन ः बाबुराव जोशी जयंती कार्यक्रम, पुरस्कारांचे वितरण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक (कै.) बाबूराव जोशी व (कै.) मालतीबाई जोशी हे शिक्षणमहर्षीच आहेत. त्यांनी रत्नागिरीसाठी दिलेल्या शैक्षणिक योगदानामुळे प्रगती होत आहे. आता आधुनिक युगात आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी कौशल्य विकासपूरक अभ्यासक्रम, रिसर्च सेंटर उभारणी, पॅरामेडिकल अभ्यासक्रम संस्था सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे, असे प्रतिपादन संस्थेच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन यांनी केले.
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक (कै.) बाबूराव जोशी यांच्या जयंतीनिमित्त संस्थेच्यावतीने तीन पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. रा. भा. शिर्के प्रशालेच्या विजयालक्ष्मी मलुष्टे रंजनमंदिर सभागृहात कार्यक्रम झाला. या प्रसंगी र. ए. सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. मुकुंदराव जोशी, कार्यवाह सतीश शेवडे, सहकार्यवाह श्रीकांत दुदगीकर, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, आजीव सभासद मंडळाचे सदस्य डॉ. संजय केतकर, आनंद देसाई, मनोज पाटणकर, सचिन वहाळकर, विजयराव देसाई, शिर्के प्रशालेचे मुख्याध्यापक, कुमारमंगलम कांबळे व्यासपीठावर उपस्थित होते. शेवडे यांनी प्रास्ताविकात र. ए. सोसायटीच्या सर्व शैक्षणिक संस्थांच्या कार्याचा आढावा घेतला. प्रस्तावांमधून पुरस्कारांची निवड करणे कठीण काम असल्याचे सांगून सहकार्यवाह श्रीकांत दुदगीकर यांनी पुरस्कारांची घोषणा केली. सूत्रसंचालन प्रा. वैभव कानिटकर यांनी केले.
चौकट १
बाबूराव जोशी यांना पद्मभूषण मिळावा
अध्यक्षीय मनोगतात संस्थेचे उपाध्यक्ष व बाबूराव जोशी यांचे नातू डॉ. मुकुंदराव जोशी यांनी बाबूराव जोशी व मालतीबाई जोशी यांच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला. बाबूराव जोशी यांनी केलेल्या उल्लेखनीय सामाजिक व शैक्षणिक कामाचा विचार करता त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले जावे, ही आपली व कुटुंबाची इच्छा आहे. यासाठी संस्थेने सहकार्य करावे, अशी भावना पटवर्धन यांनी व्यक्त केली.
चौकट २
साखळकर, लोंढे, बेर्डे यांना पुरस्कार
बाबूराव जोशी आदर्श शिक्षक पुरस्कार रा. भा. शिर्के प्रशालेतील शिक्षिका स्नेहा साखळकर, (कै.) मालतीबाई जोशी आदर्श कर्मचारी पुरस्कार जी. जी. पी. एस. विद्यालयाचे लिपिक गजानन लोंढे आणि (कै.) मालतीबाई जोशी आदर्श सेवक पुरस्कार कीर विधी महाविद्यालय येथील सेवक सुरेश बेर्डे यांना प्रदान करण्यात आला.