94735
‘हापकिडो’ स्पर्धेत खारेपाटण शाळा चमकली
जिल्हास्तरीय स्पर्धा; विद्यार्थ्यांना मिळाली आत्मसंरक्षणाची ताकद
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २७ : खारेपाटण हायस्कूल येथे नुकत्याच झालेल्या ‘हापकिडो’ जिल्हास्तरावरील स्पर्धेत शेठ न. म. विद्यालय, खारेपाटणच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर नेत्रदीपक यश प्राप्त केले. सहभागी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे सर्वस्तरांतून कौतुक होत आहे.
स्पर्धेचे उद्घाटन खारेपाटण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य संजय सानप यांच्या हस्ते झाले. यावेळी हापकिडो बॉक्सिंग महाराष्ट्र राज्य सचिव राज वागतकर, महाराष्ट्र राज्य शालेय क्रीडा समिती सचिव उमेश शिंदे, राष्ट्रीय पंच विजय तिथे, यश शेळके, शिवशरण कुंभार, पर्यवेक्षक संतोष राऊत आदी उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये यश प्राप्त केल्याबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.
स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी असे ः ४३ किलो मुले-वेदांत कोवळे, उमेश सुर्वे, अथर्व देसाई. ४६ किलो मुले-अर्णव जामसंडेकर, हर्ष तावडे, जय उन्हाळकर. ४९ किलो मुले-हर्ष गुरव, सम्मेद उपाध्याय, अनिश तिल्होरकर, ५३ किलो मुले-तुषार पांचाळ, निनाद तावडे. ५५ किलो मुले-अजीज मुजावर, शुभम चव्हाण, राज हरयाण. ५८ किलो मुले-शिवराज पवार, प्रतीक धुळप. ६१ किलो मुले-साहिल कदम, सोहम पवार. ६४ किलो मुले-अजय हिप्परकर, आयुष हरियाण. ६७ किलो मुले-अहमद पावसकर.
३३ किलो मुली-जागृती तावडे, सानिया जाधव, सारंगी कानडे. ३६ किलो मुली-सृष्टी शेट्टी, प्रियंका तावडे, समीक्षा जेधे. ३९ किलो मुली-त्रिवेणी परब, पायल गुरव, श्रावणी निमगारे. ४२ किलो मुली-अनुष्का गाडी, मयुरी सुतार, ऋतुजा गायकवाड. ४५ किलो मुली-अनुष्का धुवाळी, दुर्वा राऊत, ईश्वरी पाटील. ४८ किलो मुली-रिया वाघरे, अनुष्का पतियान, सृष्टी कोलते. ५१ किलो मुली-
सानिका गावडे, सारा शेंगाळे, नीलम अडुळकर. ५४ किलो-तेजस्वी मिशाळ, सारा कांबळे, सांगवी कानडे. ५८ किलो-आर्या शिंदे, रिदा शेमणे. ६० किलो-सानिया पवार, मनाली साळवी. ६३ किलो मुली-किंजल इंगळे, सानवी धुरी. ६३ किलो मुली-श्रावणी तावडे, अपूर्वा जाधव.
दक्षिण आशिया टेकयान महासंघाचे महासचिव अॅड. राज वागदकर यांच्या उपस्थितीत झालेल्या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष भाऊ राणे, सचिव महेश कोळसुलकर, प्रा. सानप, पर्यवेक्षक राऊत आदींनी अभिनंदन केले.
----
हापकिडो : स्वसंरक्षणासह शिस्त!
क्रीडा स्पर्धकांच्या मते, ‘हापकिडो’ हा दक्षिण कोरियातील पारंपरिक मार्शल आर्ट आहे. यात स्वसंरक्षणावर विशेष भर दिला जातो. लाथा, घुस्से, पकड सोडवणे, फेक तंत्र यांचा समावेश आहे. प्रतिस्पर्ध्याची ऊर्जा त्याच्यावर वळवणे, हे यामागचे खास तत्त्वज्ञान आहे. हा क्रीडा प्रकार अस्त्र व निरस्त्र अशा दोन्ही पद्धतींनी खेळला जातो. शिस्त, आत्मविश्वास, आणि मानसिक ताकद वाढवणे हे उद्दिष्ट आहे. ‘हापकिडो’ जगभर स्वसंरक्षण प्रशिक्षणासाठी लोकप्रिय झाला आहे. हा केवळ प्रकार क्रीडा नसून, जीवनशैलीचा शिस्तबद्ध मार्ग मानला जातो.