94740
सिंधुदुर्गच्या उद्योगांना देणार नवी बाजारपेठ
नीतेश राणे ः कुडाळात भाजपतर्फे ‘व्होकल फॉर लोकल’ प्रदर्शन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २७ ः ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेतून भारत सर्व वस्तूंचे उत्पादन करणारा देश बनेल आणि कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही. त्यामुळे भारत महासत्ता बनेल. या कार्यक्रमाचा उद्देश येथील उद्योजकांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा आहे. या उद्योगांना स्थानिक बाजारपेठेसह मुंबई तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठ कशी मिळवून देता येईल, याकडे माझे लक्ष असणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री नीतेश राणे यांनी येथे केले.
भाजपतर्फे ‘व्होकल फॉर लोकल’ या संकल्पनेवर आधारित वस्तू प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. भाजप महिला मोर्चा, कुडाळ मंडलातर्फे ‘सेवा पंधरवडा’निमित्त ‘व्होकल फॉर लोकल’ या संकल्पनेवर आधारित एकदिवसीय भव्य वस्तू प्रदर्शन व विक्रीचे आयोजन कुडाळ येथे केले होते. स्वदेशी वस्तू, लघू उद्योजक आणि बचत गटांच्या उत्पादनांना थेट बाजारपेठ मिळवून देण्यासाठी तसेच त्यांच्या उत्पादनांना ओळख प्राप्त व्हावी, हा यामागील प्रमुख उद्देश होता. या कार्यक्रमाला पालकमंत्री राणे यांनी विशेष उपस्थिती दर्शवली.
या कार्यक्रमाला भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राजू राऊळ, बंड्या सावंत, संध्या तेर्से, संजय वेंगुर्लेकर, अदिती सावंत, आरती पाटील, रूपेश कानडे, मोहन सावंत, गजानन वेंगुर्लेकर, विजय कांबळी, मुक्ती परब, किरण शिंदे, अक्षता खटावकर, सुप्रिया वालावलकर, उदय मांजरेकर, ज्योती जळवी, सचिन काळप, सुनील बांदेकर, राजा धुरी आदी उपस्थित होते.
---
मंत्रालयात सिंधुदुर्गचे ४० स्टॉल लावणार
पालकमंत्री राणे यांनी, दोन आठवड्यांत मंत्रालयात सिंधुदुर्गातील ४० स्टॉल लावण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्पादनांना बाजारपेठ आहेच. मात्र, जिल्ह्याबाहेर यापेक्षा मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे, यावर भर दिला. ते स्वतः त्यांच्या मंत्रालयाच्या केबिनमध्ये येणाऱ्या पाहुण्यांना व मंत्र्यांना कोकणातील खाजा आणि खोबऱ्याची वडी यांसारखे स्थानिक पदार्थ ठेवतात, जेणेकरून कोकणच्या पदार्थांची चव लोकांपर्यंत पोहोचावी. येत्या पाच वर्षांत या उद्योजकांना मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी घेत असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.