rat२७p५.jpg-
P25N94721
रत्नागिरी : मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवामध्ये गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संहितेला रौप्यपदक मिळाले.
‘गोगटे’महाविद्यालयास स्कीट स्पर्धेत रौप्यपदक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ : ५८व्या आंतरमहाविद्यालय सांस्कृतिक युवा महोत्सवासाठी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या अंतिम फेरीमध्ये गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या संघाने स्कीट स्पर्धेत रौप्यपदक पटकावले.
मनस्वी वारीक, गायत्री मांगले, आस्था खेडकर, मैथिली सावंत, प्रार्थना भंडारे, (सर्व बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या विद्यार्थिनी) आणि मधुश्री वझे (संस्कृत विभाग) यांचा सहभाग होता. या संहिता लेखन आणि दिग्दर्शन मयूर साळवी यांनी केले. ‘गाठोडं’ हे मराठी संहिता महिलांच्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर येणाऱ्या वेगवेगळ्या समस्यांवर आधारित आहे. हे संहिता मंगळागौरीच्या खेळांमधून मांडण्यात आले आहे. प्रत्येक महिलेला एका आजीच्या गाठोड्याची म्हणजेच तिच्या मार्गदर्शनाची गरज असते. महिलांचं आयुष्य मांडण्याचा एक सुंदर प्रयत्न या स्कीटमधून केला आहे. प्रा. वेदांत सौंदलेकर आणि डॉ. आनंद आंबेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या यशाबद्दल प्राचार्य डॉ. मकरंद साकळकर, उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये, उपप्राचार्य डॉ. सीमा कदम, उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी, डॉ. आनंद आंबेकर यांनी अभिनंदन केले.