-rat२७p३०.jpg-
२५N९४८४८
खेरवसे : येथे टाकण्यात येत असलेला कचरा.
-----
घनकचरा प्रकल्पावर विरोध कायम
चार गावातून विरोध; लांजा -कोत्रेवाडीवासीयांचे उपोषण सुरू
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. २७ ः नगरपंचायतीसमोर घनकचरा व्यवस्थापनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस हा प्रश्न अधिकच गंभीर बनत चालला आहे. धुंदरे, कोत्रेवाडी आणि कुवे येथील जागांना स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शवल्यानंतर काही दिवसांपूर्वी खेरवसे गावात कचरा टाकण्यात आला होता; मात्र तेथूनही विरोधाचा भडका उडाला. पाठोपाठ होणाऱ्या विरोधामुळे नगरपंचायतीची डोकेदुखी वाढली आहे. घनकचरा प्रकल्प उभारण्याचे मोठे आव्हान नगरपंचायतीसमोर आहे.
घनकचरा प्रकल्पाविरोधात कोत्रेवाडी येथील नागरिकांचे साखळी उपोषण सलग ४२ दिवस सुरू आहे. प्रकल्प रद्दचे पत्र मिळाल्याशिवाय उपोषण थांबवणार नाही, या निर्णयावर नागरिक ठाम आहेत. स्थानिक प्रशासनासोबत वेळोवेळी बैठका होऊनही तोडगा निघालेला नाही. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीतसुद्धा सर्वमान्य तोडगा निघालेला नाही. परिणामतः उपोषण सुरू आहे.
लांजा नगरपंचायत हद्दीत दररोज साडेचार ते पाच टन इतका कचरा गोळा होतो. हा कचरा सध्या तात्पुरत्या स्वरूपात भाडेकरार करून टाकण्यात येत असला तरी कायमस्वरूपी उपाय न झाल्यास मोठे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लागल्यास स्वच्छतेचा प्रश्न गंभीर होईलच शिवाय नागरिकांच्या आरोग्यालादेखील मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
---
चौकट
वेंगुर्लाप्रमाणे प्रकल्प उभारावा
वेंगुर्ला नगर परिषदेने यशस्वीपणे राबवलेल्या घनकचरा प्रकल्पाचा आदर्श घेऊन लांजामध्येदेखील असा प्रकल्प राबवावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. वेंगुर्ल्यातील उपक्रमामुळे कचरा व्यवस्थापन सुलभ झाले असून, वेंगुर्ला घनकचरा प्रकल्प हा शून्य कचरा संकल्पनेवर आधारित एक आदर्श प्रकल्प आहे, ज्यामध्ये प्रत्येक घरात कचऱ्याचे ओला, सुका आणि धोकादायक कचरा अशा श्रेणींमध्ये विभाजन केले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.