rat28p3.jpg-
94918
प्रशांत परांजपे
वसा वसुंधरा रक्षणाचा...लोगो
इंट्रो
शमी वृक्षाची पूजा करायला आणि आपट्याची पूजा करण्यासाठी या दोन्ही झाडांचं जतन करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि यामुळेच विजयादशमीच्या दिवशी आपण प्रत्येकाने एक तरी आपटा आणि शमीचं झाड हे प्रत्येकाच्या आवारामध्ये लावण्याचा आणि ते जगवण्याचा संकल्प करून नव्या विचारांचे सीमोलंघन करूया...!
- डॉ. प्रशांत परांजपे, दापोली.
---------
करूया विचारांचे सीमोल्लंघन
विजयादशमी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय. विजयादशमी हा सण प्रामुख्याने वाईट प्रवृत्तींवर चांगल्याचा विजय होण्याचे प्रतीक आहे. याच न्यायाने आपण विजयादशमीच्या निमित्ताने संकल्प करूया हरितक्रांती घडविण्याचा आणि कचरामुक्तीचा.
शुभ कार्याची सुरुवात करण्याचा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो, म्हणून या दिवशी कोणत्याही शुभ कामाची सुरुवात करणे शुभ मानले जाते. तसेच सामाजिक सलोखा जपण्यासाठी हा सण एकमेकांमध्ये प्रेम वाढवतो आणि परस्परांचा विचार करण्यास शिकवतो. म्हणूनच आपण नव्या विचारांचे, हरितक्रांतीचे बीज मनामनात पेरून स्वच्छतेचा संकल्प करूया.
शमी आणि आपटा पूजनही या दिवशी केले जाते. शमीच्या झाडाची पूजा केली जाते आणि आपट्याची पाने एकमेकांना दिली जातात. याच दिवशी ज्ञान आणि शस्त्रांची पूजा केली जाते. दसऱ्याला ज्ञान आणि शक्तीचे प्रतीक असलेल्या सरस्वती देवीची आणि शस्त्रांची पूजा करण्याची प्रथा आहे. म्हणजेच एकंदरीतच आपण विजयादशमीचा आनंद उत्सव पाहिला तर तो शंभर टक्के पर्यावरणाशी निगडित आहे. शमी वृक्षाची पूजा करायला आणि आपट्याची पूजा करण्यासाठी या दोन्ही झाडांचं जतन करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि यामुळेच विजयादशमी दिवशी आपण प्रत्येकाने एक तरी आपटा आणि शमीचं झाड हे प्रत्येकाच्या आवारामध्ये लावण्याचा आणि ते जगवण्याचा संकल्प केला तरच या विजयादशमी निमित्त आपण आनंद व्यक्त करण्यासाठी समृद्ध होणार आहोत.
दुर्दैवाने, विजयादशमीच्या आदल्या दिवशी बाजारपेठेमध्ये आपट्याच्या फांद्या तोडून आणल्या जातात आणि त्याची विक्री होते. दुसऱ्या दिवशी प्रत्येकाच्या घरामध्ये आणि इतर स्थळांवर, मंदिरांमध्ये आपट्याच्या पानांचा खच पडलेला असतो. या आपट्याच्या पानांना दुर्दैवाने कचऱ्यात ढकललेले दिसून येते. किमान या आपट्याच्या पानांना निर्माल्य म्हणून जमा करून त्याचं निर्मात्याच्या आदराने विसर्जन करावं आणि खत निर्मितीसाठी त्याचा उपयोग करावा.
शमी वृक्षाचे जतन करणं का अत्यावश्यक आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. शमी वृक्षाचा उपयोग पोटदुखी, अतिसार, बद्धकोष्ठता, त्वचेचे विकार आणि श्वसनमार्गाच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी होतो. त्याची पाने फायबरयुक्त असल्याने पचन सुधारतात, तर सालीचा उपयोग फोडांवर लावण्यासाठी केला जातो. याव्यतिरिक्त, शमी वृक्षाची पाने आणि बारीक फांद्या (स्टिक) धार्मिक कार्यांमध्ये आणि हवामानातील वाईट प्रभावांना कमी करण्यासाठी समिधा म्हणून वापरले जातात.
त्याचप्रमाणे आपटा वृक्षाचेही आपण उपयोग जाणून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे. आपटा वृक्षाचा उपयोग त्वचेचे आजार, किडनीचे विकार आणि पित्त-कफ दोषांवर उपचार करण्यासाठी होतो. आपट्याचा रस किडनीसाठी चांगला आहे; त्याचा काढा लघवीची समस्या आणि मुतखडा दूर करतो. तसेच पाने बुरशीजन्य संसर्ग आणि दम्यासाठीही उपयुक्त आहेत. ढोपर दुखीवर आपट्याची पाने बांधून ठेवल्यास दुखणं कमी होते.
विजयादशमी आणि शमी व आपटा या दोन वृक्षांची किती घनिष्ठ मैत्री आहे किंवा संबंध आहे, हे आपण जाणून घेतलं. दापोलीतील निवेदिता प्रतिष्ठानच्या माध्यमातून दापोली आणि रत्नागिरी येथे शंभर आपट्याच्या रोपांचे वाटप करण्यात आले. याचे अनुकरण प्रत्येकाने करून आपल्या पुढच्या दोन पिढ्यांसाठी वृक्ष लागवड करून जोपासना करायला पाहिजे. विचार बदलला, विचारांमध्ये सकारात्मकता आणली की देश बदलू शकतो. तसाच निसर्गही बदलू शकतो. सध्या विचार बदलले असल्यामुळे आणि निसर्गाचा कोणताही विचार होत नसल्यामुळे वारंवार निसर्ग आपल्याला शिक्षा देतो आहे. तरीदेखील आपल्याच धुंदीत असणारा मानव बेदरकारपणे वृक्षतोड करीत सुटला आहे आणि ‘मला काय त्याचे’ ही वृत्ती दुर्दैवाने बळकट झाल्यामुळे दिसेल तेथे कचराही करीत आहे.
शासनाने केलेले कायदे, नियम हे पाळायचेच नसतात अशा चुकीच्या समजुतीमुळे किंवा कायदे आणि नियम जनतेपर्यंत पोहोचवण्यात शासन-प्रशासन अपयशी ठरल्यामुळे कचरा आणि हरित आच्छादन हे दोन विषय प्रत्येक नागरिकांच्या जीवनाचा अविभाज्य घटक असतानाही पूर्णतः त्याकडे दुर्लक्ष झालेले आहे.
हरित आच्छादन कमी झाल्याने हवामानातील बदल, वाढलेले प्रदूषण, जैवविविधतेचा नाश, जमिनीचा ऱ्हास, पाण्याच्या स्त्रोतांची कमतरता आणि नैसर्गिक आपत्ती वाढणे असे गंभीर परिणाम होतात. यामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढते, शहरी भागातील तापमान वाढते, ध्वनी प्रदूषण वाढते आणि पर्यावरणाचे संतुलन बिघडते.
झाडे कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि तापमान नियंत्रित करतात. हरित आच्छादन कमी झाल्याने वातावरणातील हरितगृह वायूंचे प्रमाण वाढते, ज्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग (जागतिक तापमानवाढ) आणि हवामानातील बदल होतात.
पृथ्वीवरील हरित आच्छादन कमी होऊ लागल्यामुळे आज पृथ्वीवरील वातावरणात बदल झाला आहे. तापमानात प्रचंड वाढ होत आहे. गतवर्षी उन्हाळ्यामध्ये अनेक ठिकाणी ४० ते ५० अंशांच्या दरम्यान तापमानात वाढ झालेली दिसून आली. तरीही आम्ही कोणतीही दखल न घेता हरित आच्छादन संवर्धनाकरिता कोणतीही दीर्घकालीन उपाययोजना केलेली दिसून आली नाही. वृक्ष लागवडीच्या कोटी कोटीच्या घोषणा हवेतच विरल्याचे दुर्दैवी चित्र आहे.
कचऱ्यासंदर्भात देखील अनेक कायदे, नियम कागदावर आहेत. या कागदावरील आदेश आणि नियमांचं वाचन करणं आणि आत्मसात करून अमलात आणणं अत्यावश्यक आहे. या विजयादशमीच्या निमित्ताने हरित आच्छादन वाढीचा आणि कचरामुक्ती या संकल्पनेचा अंगीकार करून विचारांचे सीमोलंघन घडवून आणून हरितक्रांती आणि कचरामुक्तीची कास धरण्याचा निश्चय करूया.
(लेखक पर्यावरणाचा शाश्वत विकास या विषयातील डॉक्टरेट पदवीधर आहेत )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.