कोकण

तोंडवली फार्मसी कॉलेजमध्ये औषध निर्माता दिन उत्साहात

CD

94998


तोंडवली फार्मसी कॉलेजमध्ये
औषध निर्माता दिन उत्साहात
नांदगाव, ता. २९ ः तोंडवली येथील सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटी संचलित श्री सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेजमध्ये जागतिक औषध निर्माता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग केमिस्ट असोसिएशनचे सचिव संजय सावंत, कोषाध्यक्ष विवेक आपटे, फार्मसिस्ट स्वप्नील माळी, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी विनायक चव्हाण, फार्मसी कॉलेजचे प्रा. डॉ. मनोज कदम, इंजिनियरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. सूरजकुमार सातवेकर, कृषी महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. योगेश पेडणेकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने हेल्थ चेकअप कॅम्प, रांगोळी, लोगो तसेच स्लोगन या विषयी स्पर्धा घेण्यात आल्या. फार्मसीचे सर्व विद्यार्थी, शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. कौसल्या पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनुराधा भोई यांनी केले. आभार प्रा. स्वाती पाटील यांनी केले.
..................
94999

अणसूर आरोग्य शिबिरात
८६ महिलांची चिकित्सा
वेंगुर्ले, ता. २९ ः ग्रामपंचायत अणसूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र रेडी व आयुष्मान आरोग्य मंदिर मोचेमाड यांच्या माध्यमातून ''स्वस्थ नारी सशक्त परिवार'' अभियान अंतर्गत महिलांसाछी आरोग्य शिबिर झाले. या शिबिराचा ८६ लाभार्थ्यांनी लाभ घेतला. अणसूर ग्रामपंचायत येथे गुरुवारी (ता. २५) या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन सरपंच सत्यविजय गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच वैभवी मालवणकर, रेडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक कदम, ग्रामपंचायत अधिकारी सायली सातोसे, ग्रामपंचायत सदस्य सीमा गावडे, संयमी गावडे, प्रज्ञा गावडे, साक्षी गावडे, वामन गावडे, सुधाकर गावडे, भाजपा पदाधिकारी आनंद गावडे, शक्तिकेंद्र प्रमुख गणेश गावडे, बूथ प्रमुख वामन गावडे, प्रभाकर गावडे, अंगणवाडी सेविका भक्ती गावडे, मदतनीस अन्नपूर्णा गावडे, आशा सेविका अनुष्का तेंडोलकर आदींसह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रेडी आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक संजय करंगुटकर यांनी केले.
..................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Trades : चेन्नईने सॅमसनच्या बदल्यात जडेजा अन् सॅम करणला का जाऊ दिलं? CSK ने अखेर सांगितली Inside Story

IND vs SA Test: रवींद्र जडेजाने घडवला इतिहास! दहावी धाव घेताच कपिल देव यांची केली बरोबरी

YouTube बनला तुमचा AI असिस्टंट! प्रत्येक व्हिडिओला विचारू शकता कोणताही प्रश्न; क्षणात मिळणार उत्तर..कसं वापरायचं? पाहा

म्हणून मकरंद अनासपुरे यांच्या पत्नीने अभिनय करणं सोडलं; सांगितलं धक्कादायक कारण, म्हणाली- अपमानास्पद बोलणं...

Crime News : पूर्वजांच्या मोक्षासाठी आईनेच घेतला दोन लेकरांचा बळी, सासऱ्याच्याही हत्येचा प्रयत्न; धक्कादायक घटनेने सगळेच हादरले

SCROLL FOR NEXT