कोकण

कुडाळ राऊळ महाविद्यालयात उद्यापासून बॅडमिंटन स्पर्धा

CD

कुडाळ राऊळ महाविद्यालयात
उद्यापासून बॅडमिंटन स्पर्धा
कुडाळ, ता. २८ ः कोकण विभागातील युवक क्रीडापटूंना संधी आणि प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने मुंबई विद्यापीठाच्या कोकण विभागीय (विभाग ४) आंतरमहाविद्यालयीन पुरुष व महिला बॅडमिंटन स्पर्धेचे यजमानपद येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाला प्राप्त झाले आहे. ही स्पर्धा ३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबरला महाविद्यालयाच्या बॅडमिंटन कोर्टवर होणार आहे.
कोकण विभागातून या स्पर्धेत १६६ स्पर्धक सहभागी झाले आहेत, अशी माहिती कोकण विभाग क्रीडा समिती सचिव प्रा. चंद्रकांत नाईक व संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अनंत लोखंडे यांनी दिली. संत राऊळ महाराज महाविद्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा. लोखंडे, प्रा. नाईक यांच्यासह संत राऊळ महाराज महाविद्यालय क्रीडा विभाग प्रमुख डॉ. प्रकाश मसुरकर, समिती सदस्य प्रा. अजित कानशिडे, प्रा. एस. एस. चव्हाण, प्रा. आर. के. सावंत, प्रा. गीताश्री ठाकूर, प्रा. काजल मातोंडकर, क्रीडा प्रशिक्षक क्रिस्टन रॉड्रिग्ज उपस्थित होते. या स्पर्धेत सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांतील एकूण ३३ महाविद्यालयांचे १६६ स्पर्धक सहभागी झाली आहेत. त्यामध्ये १०६ मुलगे व ६० मुली आहेत. सोमवारी (ता. २९) सायंकाळी या स्पर्धकांची नोंदणी होऊन लॉट्स टाकण्यात येणार आहेत. मंगळवारी (ता. ३०) सकाळी १० वाजता या स्पर्धेचे उद्घाटन तर बुधवारी (ता. १) सांगता होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Municipal Election : नाशिक महापालिका निवडणुकीत 'एकला चलो' रे! जागावाटपावर भाजपची टाळाटाळ; शिवसेनेची स्वबळाची तयारी सुरू

Gauri Garje Death Case पत्नीनं आत्महत्या केलीय, अनंतनं फोन करून रडत रडत सांगितलं; काय घडलं? पंकजा मुंडेंनी दिली माहिती

IND vs SA, 2nd Test: मुथुसामी-यान्सिनचा टीम इंडियाला दणका, द. आफ्रिकेकडे दुसऱ्या दिवसअखेर मोठी आघाडी

महिन्याभरापूर्वी लग्न, पण महिला दीड महिन्यांची गर्भवती; डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक कारण...

दुर्दैवी घटना ! 'अणदूरजवळ अपघातात तीन ठार; अकरा जखमी', खंडाेबाचा नवस फेडण्यासाठी पुण्यातील भाविक निघाले अन्..

SCROLL FOR NEXT