कोकण

जागतिक हृदय दिन

CD

जागतिक हृदय दिन---------लोगो

इंट्रो

२९ सप्टेंबर हा दिवस जगभरात जागतिक हृदय दिन म्हणून साजरा केला जातो. हृदयरोग व रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांविषयी जनजागृती करणे, त्यांचे प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणे हे या दिवसाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आज हृदयरोग हा जगभरातील मृत्यूचे एक प्रमुख कारण मानला जातो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू हृदयविकारांमुळे होतो. हृदयाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. वेळेत तपासण्या करून घेणे, चेतावणीची चिन्हे ओळखणे आणि त्वरित उपचार घेणे हे जीव वाचविण्यासाठी आवश्यक आहे. हृदयाच्या आजारांबाबत जागरूक राहणे म्हणजे आपल्या कुटुंबाचे व समाजाचे आरोग्य सुरक्षित ठेवणे होय...!

- डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी

-------

हृदयाचा प्रत्येक ठोका जपा

भारतामध्ये गेल्या काही दशकांत हृदयरोगाचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. शहरी तसेच ग्रामीण भागात चुकीच्या जीवनशैलीमुळे तरुणांमध्येही हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. जास्त तणाव, तेलकट व जंकफुडचा वाढता वापर, व्यायामाचा अभाव, धुम्रपान व मद्यसेवन ही प्रमुख कारणे ठरत आहेत. आरोग्य विभागाने जागतिक हृदय दिनानिमित्त यंदा “Don’t Miss a Beat” म्हणजेच हृदयाचा प्रत्येक ठोका जपा असा संदेश देणारी थीम दिली आहे. या दिवसानिमित्त आरोग्य विभागामार्फत रत्नागिरी जिल्ह्यात विविध जनजागृती उपक्रम राबवले जात आहेत. राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात नियमित मधुमेह तपासणी, रक्तदाब तपासणी करून औषधोपचार, समुपदेशन, आरोग्य सल्ला दिला जात आहे.
सध्या रत्नागिरी जिल्ह्यात एसटीईएमआय हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय, सर्व ग्रामीण रुग्णालये, सर्व उपजिल्हा रुग्णालये आणि सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे स्तरावर शासनातर्फे ईसीजी मशीनचे वाटप करण्यात आले आहे. हा कार्यक्रम जिल्ह्यात Hub and Spoke मॉडेलनुसार राबविला जातो. यामध्ये सर्व आरोग्य संस्था या स्पोक (spoke) म्हणून काम करतात व त्या आरोग्य संस्थांच्या जवळ असलेली मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स (hubs) म्हणून काम करतात. जेव्हा स्पोक येथे एखाद्या हृदयविकाराच्या (myocardial infarction) रुग्णाचे निदान होते, तेव्हा तो रुग्ण त्वरित हब येथे संदर्भित केला जातो. जेणेकरून रुग्णावर वेळेत योग्य उपचार होऊन त्याचे प्राण वाचण्यास मदत होते. याचा आजवर अनेक रुग्णांना फायदा झाला आहे.
“प्रत्येक ठोका महत्त्वाचा आहे” हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वॉकाथॉन, सायक्लोथॉन तसेच सोशल मीडियाद्वारे मोहिमा राबविणे आवश्यक आहे. हृदय हा आपल्या शरीराचा सर्वात महत्त्वाचा अवयव असून त्याचे आरोग्य सांभाळणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. २०२५ च्या जागतिक हृदय दिनाची थीम “Don’t Miss a Beat” आपल्याला सांगते की आपल्या हृदयाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. योग्य आहार, नियमित व्यायाम, तणावमुक्त जीवनशैली व वेळेवर आरोग्य तपासणी केल्यास हृदय निरोगी राहते. “निरोगी हृदय – निरोगी जीवन” हा संदेश आत्मसात करून समाजातील प्रत्येक नागरिकाने हृदयविकारांविरुद्ध एकत्रितपणे लढा देणे गरजेचे आहे.
--------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swami Chaitanyanand Saraswati : स्वामी चैतन्यानंद सरस्वती याला ५ दिवसांचा पोलिस कोठडी; पटियाला हाऊस कोर्टाचा मोठा झटका

IND vs PAK Final: ICC ने दंड ठोठावल्यावर सुधारला पाकिस्तानी ओपनर, पण आऊट होताच भडकला अन्...; VIDEO

Balasaheb Thorat: संकटातील बळीराजाला कर्जमाफी द्या : माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात; सरकारला गांभीर्य नाही

IND vs PAK Final Live: जसप्रीत बुमराहने स्पेल संपवला, आता भारताची वाढणार डोकेदुखी? ८ फलंदाजांसह उतरलेत, कोण उचलणार 'डेथ ओव्हर'चा भार?

Amit Shah: देशातून नक्षलवाद कधी नष्ट होणार? अमित शहांनी मोठी घोषणा करत थेट तारीखच सांगितली, म्हणाले...

SCROLL FOR NEXT