कोकण

विशेष ः मालक कल्पवृक्षाचा तरी नुकसानीत

CD

सकाळ विशेष---------लोग

फोटो ओळी
- rat२८p१३.jpg-
९४९६२
भाट्ये नारळ संशोधन केंद्रातील नारळाची झाडे
rat२८p१४.jpg-
९४९६३
येथील भाट्ये नारळ संशोधन केंद्र.
- rat२८p१५.jpg, rat२८p१६.jpg-
९४९६४
लगडलेले नारळ
-----------

सकाळ विशेष ------लोगो

इंट्रो

नैसर्गिक आपत्ती, पर्यावरणात सतत होणारे बदल, अनियमित पाऊस आणि कीड रोगांचा होणारा प्रादुर्भाव अशा विविध कारणांमुळे नारळ निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकला आहे. संधी असूनही या ‘कल्पवृक्षा’ची व्यावसायिक दृष्टिकोनातून लागवड होत नाही. त्यातून, नारळाचे उत्पादन निम्म्यापेक्षा अधिक घटलेले आहे. जोडीला परराज्यातून होणारा पुरवठाही मोठ्याप्रमाणात घटलेला आहे. दिवसेंदिवस नारळाची मागणी वाढत असतानाच पुरवठ्यात तफावत निर्माण झालेली आहे. त्याचा परिणाम नारळाच्या दरावर झालेला आहे. बाजारातील नारळाच्या दराने गाठलेल्या ‘साठी’ने ‘कभी खुशी, कभी गम’ अशी स्थिती आहे.

- राजेंद्र बाईत, राजापूर
---

मालक कल्पवृक्षाचा
तरीही नुकसानीत
नारळ उत्पादकांची व्यथा ; उत्पन्न व उत्पादनात घट

धार्मिक कार्य, लग्नसमारंभ असो वा देवदर्शन यासाठी मोठ्याप्रमाणात नारळाची मागणी असते. त्याचवेळी रूचकर जेवणासाठी नारळ महत्त्वपूर्ण असल्याने घरगुती वापरासह हॉटेल व्यावसायिकांकडून नारळाची मोठ्या प्रमाणात मागणी असते. या व्यतिरिक्त शरीरपोषणासाठीही नारळ पाणीउपयुक्त असल्याने नारळाच्या शहाळ्याला पसंती मिळते. त्यातून, दरवर्षी नारळ खरेदी-विक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वर्षभरामध्ये विविध कारणांसाठी सुमारे २० ते २२ लाख नारळाच्या नगांची खरेदी-विक्री होते. सरासरी ३०-३५ रुपये प्रति नग किमतीप्रमाणे वर्षभरामध्ये सुमारे ८ ते १० कोटी रुपयांची उलाढाल होत असली तरी, सध्या दराच्या गाठलेल्या साठीने याच उलाढालीमध्ये वाढ होताना सुमारे १२ ते १४ कोटीपर्यंत वाढल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
.....................

विविध कारणांमुळे उत्पादनात घट

गेल्या काही वर्षामध्ये कोकण किनारपट्टीवर सातत्याने विविध प्रकारची वादळे येत आहेत. अतिवृष्टीचे प्रमाणही वाढले आहे. वादळे आणि अतिवृष्टीमध्ये पिळवटून नारळाच्या झाडाचा शेंडा तुटणे, पोय खराब होणे यांसारखे प्रकार घडत आहेत. तर, दुसर्‍या बाजूला नारळाच्या झाडाचा शेंडा मरणे, फळगळती, फुलोरा मोडून जाणे यांसारख्या विविध समस्यांना बागायतदारांना सामोरे जावे लागत आहे. त्याच्या जोडीला विविध कीडरोगांचा प्रादुर्भावही वाढत चालला आहे. अन्य बागायतींप्रमाणे नारळ बागायतींना माकडांच्या उपद्रवाची झळ पोहोचत आहे. या साऱ्यांमुळे अपेक्षित फळधारणा होत नसल्याने नारळाचे उत्पादन कमालीचे घटले आहे. सर्वसाधारणतः एका नारळाच्या झाडापासून वा माडापासून सरासरी १२० नारळ (फळ) एका हंगामामध्ये मिळणे अपेक्षित आहे; मात्र, अपेक्षित उत्पादनात घट होऊन सद्यःस्थितीमध्ये ९०-९५ फळे मिळत आहेत.
...............

उत्पादन आणि मागणीमध्ये लक्षणीय तफावत

जगभरामध्ये हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येथील शेतकर्‍यांकडून आंबा, काजू लागवडीच्याजोडीने उपलब्ध असलेल्या नैसर्गिक जलस्रोतांचा सदुपयोग करत नारळ लागवडही केली आहे. त्यातून, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नारळी-पोफळीच्या बागा विकसित झाल्याचे दिसत आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ५ हजार ६५६ हेक्टर क्षेत्र नारळाची लागवड झालेली आहे. त्याच्यातून, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुमारे ४ लाख ६ हजार फळ नगांचे दरवर्षी उत्पादन होते. धार्मिक कार्य, जत्रोत्सव यांसह हॉटेलमध्ये मागणी, दैनंदिन घरगुती जेवणामध्ये वापर, शहाळी म्हणून उपयोग आदी विविध कारणांसाठी सुमारे २० ते २२ लाख फळ नगांची आवश्यकता भासते; मात्र, मागणीच्या तुलनेमध्ये जिल्ह्यात सुमारे सोळा लाख फळ नगांचे उत्पादन कमी असल्याने उत्पादनाच्या तुलनेमध्ये प्रत्यक्ष मागणीची असलेली ही तूट भरून काढण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याला महाराष्ट्राच्या विविध भागासह केरळ, तामिळनाडू आदी राज्यांवर आयातीच्या माध्यमातून अवलंबून राहावे लागत आहे. नारळाच्या सातत्याने होणाऱ्या दरवाढीला उत्पादन अन् मागणीतील तफावतही काहीअंशी कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे.
............

rat२८p१७.jpg-
N94966
विक्रीसाठी ठेवलेले नारळ

देवीची ओटी खातेय भाव
नवरात्रोत्सवामध्ये देवीची ओटी भरण्याला धार्मिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात नारळांची मागणी आहे. त्यातून, दरदिवशी लाखो नारळांच्या नगांची खरेदी-विक्री होताना दिसत आहे; मात्र, नारळाच्या दराने गाठलेल्या सरासरी पन्नाशी ते साठीने ओटीचे दरही कमालीचे वाढले आहेत. साठ रुपयांपासून ते थेट शंभर दीडशे रुपयांपर्यंत ओटीचे दर गेले आहेत. नारळाच्या वाढलेल्या दराने ओटी भाव खाऊन जात असली तरी, त्याचा भाविकांना आर्थिकदृष्ट्या फटका बसताना आहे.
...............

प्रक्रिया उद्योगांसाठी वाढली मागणी

ताज्या नारळाच्या दूध वा गरापासून कमी उष्णतेचा वापर करून व्हर्जिन कोकोनट ऑईल तयार केले जाते. व्हर्जिन नारळ तेलामध्ये नियमित तेलापेक्षा जास्त अ‍ॅंटिऑक्सिडंट्स आणि भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जाते. आयुर्वेदिक उत्पादनातील वाढती आवड, ग्राहकांमध्ये नैसर्गिक आणि रासायनिक उत्पादनांबद्दलची जागरूकता, बहुद्देशीय वापर आणि आरोग्याच्यादृष्टीने औषधी गुणधर्म यामुळे व्हर्जिन कोकोनट तेलाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये विशेषतः जर्मनी, फ्रान्स व युरोपीय देशांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यातून, प्रक्रिया उद्योगांसाठी नारळाची मागणी वाढली असून त्याचाही नारळाच्या दरामध्ये झालेल्या वाढीवर परिणाम झाल्याचे बोलले जात आहे.
..................

नारळ दरवाढीचा ‘कभी खुशी, कभी गम’

नारळाच्या सातत्याने वाढणार्‍या दराने आणि सद्यःस्थितीमध्ये गाठलेल्या ‘दराच्या साठी’ सर्वसामान्यांची चिंता वाढविली आहे. नारळाला रुचकर जेवण होण्यासह धार्मिकदृष्ट्या विशेष असलेले महत्त्व पाहता नारळाचे दर वाढले असले तरी, त्याला अन्य पर्याय उपलब्ध नसल्याने नारळाच्या मागणीमध्ये फारशी घट झालेली नाही. त्यामुळे नारळाच्या वाढलेल्या दराने नारळ बागायतदार, शेतकर्‍यांसह विक्रेते, व्यापारी यांच्या चेहर्‍यावर हास्य फुललेले आहे. नारळ बागायतदार, शेतकरी यांच्याकडून व्यापारी खरेदी करतातच, त्याच्या जोडीला अलीकडे अनेक ग्राहक नारळ खरेदीसाठी व्यापारी, विक्रेते यांच्याकडे जाण्याऐवजी थेट नारळ बागायतदारांकडे जाताना दिसत आहेत. त्यामुळे वाढलेल्या दराचा नारळ बागायतदार वा शेतकरी यांना थेट फायदा होताना दिसत आहे. तर, व्यापारी, विक्रेत्यांच्या हातामध्येही नारळविक्रीतून चांगले पैसे येत आहेत.
.................

संकटातच संधी

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सद्यःस्थितीमध्ये सुमारे ४ लाख नारळ नगांचे उत्पादन होत आहे. मात्र, विविध कारणांसाठी २० ते २२ लाख नारळ नगांची मागणी असते. त्यामुळे उत्पादन आणि मागणी यांमध्ये असलेला सुमारे १६ लाख नारळ नगांचा फरक भरून काढण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये केरळ, तामिळनाडू येथून नारळ आयात केला जातो. नारळाची झावळे, काथ्या आदी विविध घटकांपासून अन्य विविध उत्पादने करणेही शक्य आहे. त्यामुळे शेतकरी, बागायतदार यांनी पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी हापूस आंबा-काजू या फलोत्पादनाच्या जोडीने नारळ बागायती विकसित केल्यास निश्‍चितच त्याचा फायदा उत्पन्न वाढीच्यादृष्टीने होणार आहे. त्याचवेळी घटलेल्या उत्पादनामुळे सातत्याने वाढणार्‍या दराने शेतकर्‍यांना व्यावसायिकदृष्ट्या नारळ लागवडीतून जादा उत्पन्न मिळविण्याची संधी आहे. त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोनातून संकटातच शेतकर्‍यांनी पुढे जाण्याची संधी शोधणे गरजेचे आहे.
....................

चौकट १
दृष्टिक्षेपात रत्नागिरी जिल्हा

रत्नागिरी जिल्हा नारळ क्षेत्र ः ५,६५६ हेक्टर क्षेत्र
रत्नागिरी जिल्हा नारळ उत्पादन ः ४ लाख ६ हजार फळ नग
किती उत्पादन वाढवण्याची गरज ः १६ लाख फळ नग
रत्नागिरीतून कुठून येतात नारळ ः महाराष्ट्राच्या विविध भागासह केरळ, तामिळनाडू
................

चौकट २

सद्यःस्थितीतील नारळाचे दर

छोटा आकाराचा नारळ ः १५-२५ रुपये
मध्यम आकाराचा नारळ ः ३०-४० रुपये
मोठ्या आकाराचा नारळ ः ४५-६० रुपये
...................

चौकट ३

राजापूर तालुक्यातील प्रगतशील शेतकरी अभिजित तेली यांनी वडील जनार्दन तेली यांच्या मार्गदर्शनाखाली वडिलोपार्जित जागेमध्ये आंबा, काजू झाडांची लागवड केली आहे. त्याच्या जोडीला त्यांनी सुमारे ३५०-४०० माडाची लागवड केली आहे. स्वानुभव आणि कृषितज्ञांच्या मार्गदर्शनानुसार नारळाच्या झाडाला योग्य वेळा पाणी देण्यासह कीडरोग नियंत्रणासाठी आवश्यक ती औषध फवारणी वा अन्य उपाययोजनाही ते नियमितपणे करतात; मात्र, गेल्या तीन-चार वर्षामध्ये नारळ बागायतीमधून अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याचा त्यांचा अनुभव आहे. या झाडांपासून वर्षाला एकत्रित सरासरी २२०० ते २५०० नारळ मिळणे अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात १००० ते १२०० नग मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली. नारळ नगाची स्थानिक पातळीवरच विक्री होऊन त्यातून, सुमारे ६० ते ७० हजार रुपये वर्षाला उत्पन्न मिळते; मात्र, नारळ बागायतीमध्ये पाण्याचा पंप चालवणे, औषध फवारणी, बागेतील गवत वा रान काढण्यासाठी कामगारांवर केला जाणारा खर्च वा अन्य व्यवस्थापनासाठी केल्या जाणार्‍या खर्चाच्या तुलनेमध्ये उत्पन्न कमी मिळते. आंबा, काजू बागायतीला जोड शेती म्हणून नारळ लागवड केलेली असली की, नारळ लागवडीमध्ये होणारे नुकसान तसे दुर्लक्षित राहते. नैसर्गिक आपत्ती वा कीडरोगाचा प्रादुर्भाव यांमुळे नारळाच्या होणारे नुकसान रोखण्यासाठी शेतकर्‍यांना कृषी तज्ञांकडून मार्गदर्शन गरजेचे आहे.
..........

नारळाला हवे पीकविमा संरक्षण

नैसर्गिक आपत्ती, पर्यावरणात सातत्याने होणारे बदल, असंतुलित पाऊस आणि कीड रोगांचा सातत्याने होणारा प्रादुर्भाव आदी कारणांमुळे नारळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. नारळ बागायतदारांचे खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ बिघडताना दिसत आहे. आंबा, काजू पिकाप्रमाणे नारळाला पीकविम्याचे संरक्षण कवच मिळत नाही. शासनाच्या पीकविम्याचे संरक्षण मिळाल्यास शेतकर्‍यांचा खर्च आणि उत्पन्नाचा बिघडणारा ताळमेळ सुस्थितीत येण्यास एकप्रकारे साहाय्य मिळणार आहे. त्यामुळे काजू, आंबा यांप्रमाणे पीकविम्याचे संरक्षण मिळावे, अशी अपेक्षा नारळ बागायतदारांकडून व्यक्त केली जात आहे.
-------

हॉटेल व्यावसायिकांकडून मागणी वाढली

हॉटेलमध्ये तयार होणाऱ्या रुचकर पदार्थांमध्ये खोबरे वापरण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यात गेल्या काही वर्षांमध्ये नाश्त्यासाठी साउथ इंडियन वा पंजाबी पदार्थांना खवय्यांकडून अधिक पसंती मिळत आहे. त्यात साउथ इंडियन पदार्थ बनविण्यासाठी नारळाचा अधिक वापर होतो. त्यामुळे नारळाची मागणी वाढलेली आहे. पर्यटनस्थळांवरील व्यावसायिकांना नारळ मिळत नाहीत. त्यामुळे परजिल्ह्यातून नव्हे तर परराज्यातून नारळ मागवावे लागतात. त्यासाठी खर्च अधिक होत आहे. नारळाच्या वाढत्या दराने निर्माण झालेल्या आर्थिक तुटीची झळ सहन केल्याची व्यथा एका हॉटेल व्यावसायिकाने मांडली.
--------

- rat२८p२०.jpg-
94969
अभिजित तेली

कोट १

नैसर्गिक आपत्तीसह कीडरोगाचा प्रादुर्भाव यांमुळे नारळाचे दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. माकडांच्या उपद्रवाने होणाऱ्या नुकसानीचा तडाखाही नारळाला बसत आहे. या नुकसानाचे कृषी विभाग वा संबंधित शासकीय यंत्रणेकडून सर्व्हेक्षण होत नाही वा शेतकऱ्यांना नुकसान रोखण्यासंबंधात मार्गदर्शनही केले जात नाही. कृषी विभाग नारळासाठीही शेताच्या बांधावर येणार कधी?
- अभिजित तेली, माजी सभापती, राजापूर पंचायत समिती
------
- rat२८p१९.jpg-
N94968
राजेंद्र नवाळे

कोट २

हॉटेलमध्ये विविध पदार्थ बनविताना नारळ, खोबरे याची आवश्यकता असते. अशा स्थितीमध्ये नारळाच्या वाढणाऱ्या दराचा आर्थिक फटका निश्चितच हॉटेल व्यावसायिकांना बसत आहे. नारळाचे दर वाढले तरी, जेवणाच्या विविध डिशेशच्या दरामध्ये त्याप्रमाणे वाढ करणे शक्य होत नाही. त्यामुळे आर्थिक झळ सोसून हॉटेल व्यवसाय करावा लागत आहे.
- राजेंद्र नवाळे, हॉटेल व्यावसायिक
-----

rat२८p२१.jpg-
94970
किरण मालशे

कोट ३

रत्नागिरी जिल्ह्यात नारळाचे क्षेत्र तुलनेत कमी आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा स्थानिक पातळीवर कमी होतो. यंदा तामिळनाडूमधून ३० टक्के पुरवठा कमी झाला आहे. तिकडे प्रक्रियायुक्त पदार्थांसाठी नारळाचा वापर वाढलेला आहे. दरवर्षी सुमारे अडीच लाखाहून अधिक नारळ रत्नागिरी जिल्ह्यात येतात. हे दरवाढीचे एक कारण आहे.
– किरण मालशे, संशोधक, भाट्ये नारळ संशोधन केंद्र
----

rat२८p२२.jpg-
94971
सुनील शिवलकर

कोट ४

गणपती, नवरात्रोत्सव, दिवाळी यासह पर्यटन कालावधीत नारळांची मागणी वाढते. तुलनेत पुरवठा कमी होतो. त्यामुळे
परजिल्ह्यातून नारळ मागवावे लागतात. तेथून नारळ आणण्यासाठीचा खर्च अधिक होतो. त्याचबरोबर नारळ झाडावरून काढणाऱ्या मजुरांचे प्रमाण कमी असल्याने त्यांची मजुरी १२० ते १५० रुपये झाली आहे. या सर्वांचा नारळाच्या दरावर परिणाम झाला आहे.
- सुनील शिवलकर, नारळ विक्रेते
----

- rat२८p१८.jpg-
N94967
प्रकाश जोग

कोट ५
नारळाच्या झाडावर गेल्या काही वर्षामध्ये किडरोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. मे महिन्यात काहीप्रमाणात फळगळतीही झाली. त्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. नारळ बागायतींच्या व्यवस्थापनावरील खर्च वाढला आहे. कमी उत्पादन, व्यवस्थापनावर होणारा वाढता खर्च यामुळे बागायतदार मेटाकुटीस आला आहे. नारळ बागायतदारांना शासनाचे पाठबळ मिळणे गरजेचे आहे. त्याचवेळी नारळाच्या रोपांना देण्यात येणारी खते शेतकऱ्यांच्या बांधावर उपलब्ध होणे आवश्यक आहेत.
- प्रकाश जोग, नारळ बागायतदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swami Chaitanyanand Saraswati : स्वामी चैतन्यानंद सरस्वती याला ५ दिवसांचा पोलिस कोठडी; पटियाला हाऊस कोर्टाचा मोठा झटका

IND vs PAK Final: ICC ने दंड ठोठावल्यावर सुधारला पाकिस्तानी ओपनर, पण आऊट होताच भडकला अन्...; VIDEO

Balasaheb Thorat: संकटातील बळीराजाला कर्जमाफी द्या : माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात; सरकारला गांभीर्य नाही

IND vs PAK Final Live: जसप्रीत बुमराहने स्पेल संपवला, आता भारताची वाढणार डोकेदुखी? ८ फलंदाजांसह उतरलेत, कोण उचलणार 'डेथ ओव्हर'चा भार?

Amit Shah: देशातून नक्षलवाद कधी नष्ट होणार? अमित शहांनी मोठी घोषणा करत थेट तारीखच सांगितली, म्हणाले...

SCROLL FOR NEXT