कोकण

रत्नागिरी- विद्युत सहाय्यक रूपाली बाचिम महावितरणमधील ''दुर्गा

CD

rat28p42.jpg-
95101
रूपाली बाचिम

नवदुर्गा - लोगो

विद्युत सहाय्यक रूपाली बाचिम महावितरणमधील ‘दुर्गा’

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ : नोकरीची काही क्षेत्रे परंपरागतपणे पुरुषप्रधान समजली जातात. अशांपैकी एक क्षेत्र म्हणजे महावितरण कंपनी होय. या क्षेत्रातील पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढत स्वत:चे स्थान निर्माण करणारी आधुनिक नवदुर्गा म्हणजे करजुवे (ता. संगमेश्वर) गावाची विद्युत सहाय्यक रूपाली बाचिम.
करजुवे गाव हे दुर्गम गाव म्हणून समजले जाते. या गावात दोन बहिणी आणि एक भावासह शिकून लहानाची मोठी झालेली रूपाली हिने महिलांना काहीसे अपरिचित असलेले आयटीआय हे क्षेत्र पुढील शिक्षणासाठी निवडले. शेती हा पारंपरिक उद्योग असलेल्या बाचिम कुटुंबीयात रूपालीच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरवल्यावर आईने शेती सांभाळत चार अपत्यांना वाढवले. या चारांपैकी तिसरी रूपाली. घराची बेताची परिस्थिती बघत बारावीनंतर काय हा प्रश्न होता; परंतु चुलते मंगेश कांगणे आणि अन्य एका नातेवाईकांनी आयटीआय करण्याचा सल्ला दिला आणि त्यासाठी इलेक्ट्रिशियन हा मार्ग दाखवला. प्रत्यक्षात ही वाट रूपालीसाठी वाटली तितकी सोपी नव्हती.
संगमेश्वर येथील आयटीआयमध्ये प्रवेश घेतल्यावर लक्षात आले की, इलेक्ट्रिशियन अभ्यासक्रमाला अवघ्या चार मुली होत्या. प्रतिकुल परिस्थितीत करजुवे ते संगमेश्वर असा प्रवास करत तिने दोन वर्षांचा अभ्यासक्रम ७१ टक्के गुण मिळवून पूर्ण केला. त्यानंतर आरवली येथे वर्षभर कंत्राटी कर्मचारी म्हणून काम केले आणि अनुभव मिळवला. पुढे शहरात जाण्याचा विचार सुरू असतानाच महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक या पदासाठीची जाहिरात रूपालीला समजली आणि तिने ऑनलाइन अर्ज केला. त्यानुसार आरवली कार्यालयातच तिची विद्युत सहाय्यक या पदावर नियुक्ती करण्यात आली. २०२१ पासून रूपाली आरवली महावितरणअंतर्गत येणाऱ्या धामापूरतर्फे संगमेश्वर या गावात कार्यरत आहे.

चौकट
...ही कामेही ती लीलया करते
महावितरणची वीजबिले वसूल करणे, मीटर बसवणे, फ्यूज बदलणे अशी कामे ती करतेच; पण विद्युत खांबावर चढून दुरूस्ती करणे, महावितरणच्या तारा ओढणे, एकमेकांना चिकटलेल्या तारा सोडवणे ही कामेही ती लीलया करते. तिला वरिष्ठ अधिकारी अमोल म्हस्के आणि लाईनमन संदेश पारधी यांचे सतत मार्गदर्शन होत असल्याचे ती आवर्जून सांगते. वेळ आली की, तातडीने धावून जाणे, रात्री-अपरात्री, अडीअडचणीच्या ठिकाणी जाऊन ती काम करते. या कामामुळे रूपाली परिसरात खूपच लोकप्रिय झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: बुमराहने काढलं बुक्कीत टेंगूळ! यॉर्करवर हॅरिस रौफचा 'दांडा' उडवला अन् प्लेन क्रॅशचं चोख उत्तर, Celebration Video Viral

Thane: ठाणे बनणार वेगवान वाहतुकीचे 'मल्टीमोडल' जंक्शन! बुलेट ट्रेन स्थानकाला रेल्वे, मेट्रो, अंतर्गत मेट्रो जोडणार, वाचा सविस्तर...

Sharad Pawar: ‘शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी: ज्येष्ठ नेते शरद पवार; अतिवृष्टीमुळे शेतकरी व सामान्य नागरिकांचे अपरिमित नुकसान

Palghar Rain: पालघरमध्ये पावसाचा जोर वाढला, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, जनजीवन विस्कळीत

IND vs PAK, Final: 33 runs 9 wickets ! पाकिस्तानी गडगडले; हवेत उडत होते, भारतीय स्पिनर्सने जमिनीवर आपटले

SCROLL FOR NEXT