कोकण

कॅरम स्पर्धेत हर्षल पाटीलने सुयश

CD

कॅरम स्पर्धेत हर्षल पाटीलचे सुयश
राजापूर ः रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने साई मित्रमंडळ गणेशोत्सवानिमित्ताने आयोजित जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत जैतापूर इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी हर्षल सुदेश पाटील याने उपविजेतेपद मिळवले. या स्पर्धेत १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या स्पर्धेत त्याने हे यश मिळवले. हर्षल पाटीलला एकनाथ पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

विनायक राऊत झाले भजनात दंग
चिपळूण : नवरात्रोत्सव म्हटलं की देवीचे दर्शन, उत्साह, ढोल-ताशांचा गजर आणि भाविकांचा ओसंडून वाहणारा उत्साह. पण यंदाच्या नवरात्रोत्सवात चिपळूणच्या जनतेला एक वेगळाच अनुभव लाभला. उद्धव ठाकरे पक्षाचे नेते व माजी खासदार विनायक राऊत देवीच्या दर्शनासाठी आले आणि क्षणभरासाठी ते नेते या चौकटीतून बाहेर पडून भक्त बनले. गोवळकोट येथील करंजेश्वरी देवीच्या मंदिरात दर्शन घेत असताना भजनी मंडळ रंगात आले होते. त्यामुळे राऊत यांना मोह आवरला नाही. हार्मोनियम ताब्यात घेतली आणि काय तुझा पंढरीचा वर्णू मी महिमा, धन्य धन्य संत जन, धन्य चंद्रभागा, हे विठ्ठलभक्तीचे गीत गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या आवाजातील ओलावा, मनातील भक्ती आणि गाण्यातील आत्मिक रंग पाहून उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.

कबनूरकर स्कूलमध्ये वह्या वाटप
साखरपा ः जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या वतीने येथील श्रीमान दत्तात्रय कबनूरकर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी संस्थेचे साहील गोरे, स्वरूप सावंत आणि राजू धामणे उपस्थित होते. साहील गोरे यांनी संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली. कोकणच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांना प्रत्येकी तीन याप्रमाणे वह्यांचे वाटप करण्यात आले.

‘डीबीजे’तर्फे विंध्यवासिनी परिसर स्वच्छ
चिपळूण ः येथील डीबीजे महाविद्यालय राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या वतीने १९ महाराष्ट्र बटालियन युनिटला ३०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने विंध्यवासिनी परिसर स्वच्छता अभियान राबववे. ४० कॅडेटने सहभाग घेतला. तसेच या अभियानात माजी नगरसेवक सुनील कुलकर्णी, प्रा. सुहास वाघमोडे यांनी सक्रिय सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: बुमराहने काढलं बुक्कीत टेंगूळ! यॉर्करवर हॅरिस रौफचा 'दांडा' उडवला अन् प्लेन क्रॅशचं चोख उत्तर, Celebration Video Viral

Thane: ठाणे बनणार वेगवान वाहतुकीचे 'मल्टीमोडल' जंक्शन! बुलेट ट्रेन स्थानकाला रेल्वे, मेट्रो, अंतर्गत मेट्रो जोडणार, वाचा सविस्तर...

Sharad Pawar: ‘शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी: ज्येष्ठ नेते शरद पवार; अतिवृष्टीमुळे शेतकरी व सामान्य नागरिकांचे अपरिमित नुकसान

Palghar Rain: पालघरमध्ये पावसाचा जोर वाढला, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, जनजीवन विस्कळीत

IND vs PAK, Final: 33 runs 9 wickets ! पाकिस्तानी गडगडले; हवेत उडत होते, भारतीय स्पिनर्सने जमिनीवर आपटले

SCROLL FOR NEXT