कोकण

शाळा तिथे दाखले; विद्यार्थ्यांसह पालक आनंदी

CD

95277

शाळा तिथे दाखले; विद्यार्थ्यांसह पालक आनंदी

सेवा पंधरवड्यानिमित्त उपक्रम ; जिल्‍ह्यात अधिवास प्रमाणपत्रांचे सर्वाधिक वितरण

विनोद दळवी : सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २९ ः महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या सेवा पंधरवडा २०२५ अंतर्गत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी नावीन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत सुरू केलेल्या ‘शाळा तिथे दाखला’ उपक्रमाला मोठा प्रतिसाद लाभत आहे. जिल्ह्यात कालपर्यंत (ता. २८) ३ हजार ९७६ विद्यार्थ्यांना जातीचे आणि २६ हजार ८०४ विद्यार्थ्यांना वय अधिवास प्रमाणपत्रांचे वितरण केले आहे.
महाराष्ट्र शासनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १७ सप्टेंबरला झालेल्या वाढदिवसाचे आणि २ ऑक्टोबरला साजरा होणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधत राज्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर हा कालावधी सेवा पंधरवडा म्हणून जाहीर केला आहे. यासाठी शासनाने एकूण तीन टप्पे केले आहेत. यातील पाहिला टप्पा १७ ते २२ सप्टेंबर या कालावधीत राबविला. यामध्ये पाणंद, रस्ते विषयक मोहीम राबविली. दुसरा टप्पा २३ ते २७ सप्टेंबर या कालावधीत राबविला असून ‘सर्वांसाठी घरे’ यासाठी पूरक उपक्रम यावेळी राबविण्यात आले. तिसरा टप्पा २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राबविला जात आहे. यामध्ये शासनाच्या सुचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांमार्फत स्थानिक परिस्थितीनुसार नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याला प्राधान्य दिले आहे.
या नावीन्यपूर्ण उपक्रमात ‘शाळा तिथे दाखला’ हा उपक्रम घेण्यात आला आहे. राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यासह केवळ दोनच जिल्ह्यांत लोकांच्या अत्यंत गरजेचा उपक्रम राबविण्यात येत आहे. मात्र, या उपक्रमाला जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी महत्त्व दिले आहे. रोजच्या रोज आढावा घेऊन तालुकावार दाखले वितरण केल्याचा अहवाल घेतला जात आहे. दूरदृश्य प्रणालीद्वारेही जिल्हाधिकाऱ्यांचा आढावा घेऊन जास्तीत जास्त दाखले वितरण होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. पालकांनी आपल्या पाल्याचे कागदपत्र वर्गशिक्षकांकडे जमा केल्यावर पुढील प्रक्रिया संबंधित शिक्षक आणि शाळा राबवित आहेत. वय अधिवास दाखल्यांसाठी अत्यंत कमी कागदपत्र केले आहेत. त्यामुळे पालकांनाही चांगलाच दिलासा मिळाला आहे.
जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या या उपक्रमाचा फायदा विद्यार्थ्यांना होत आहे. शाळा प्रवेशावेळी जातीच्या, वय अधिवास दाखल्यांसाठी होणारी परवड विद्यार्थी व पालक यांची थांबणार असल्याने जिल्ह्यातील नागरिकांनी याबाबत जिल्हा प्रशासनाला धन्यवाद व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. विद्यार्थी, पालकांनी या उपक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद दिला आहे. जात आणि वय अधिवास मिळून जिल्हा प्रशासनाने ७७ हजार २६१ दाखले वितरित करण्याचे निश्चित केले आहे. त्यात जातीचे २२ हजार २५५ तर वय अधिवासचे ५५ हजार ६ दाखल्यांचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
...................
जातीचे ३९७६ दाखले वितरीत
शाळा तिथे दाखला उपक्रम अंतर्गत जिल्हा प्रशासनाने २२ हजार २५५ दाखले वितरित करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यातील ३ हजार ९७६ दाखले कालपर्यंत (ता. २८) वितरित केले. उद्दिष्टांच्या १७.८७ टक्के काम झाले आहे. यात सर्वाधिक दाखल्यांचे वितरण मालवण तालुक्यात ३२.१० टक्के झाले आहे. त्या पाठोपाठ कणकवली तालुक्यात २९.९२ टक्के, दोडामार्ग तालुक्यात २४.९१ टक्के काम झाले आहे. सर्वांत कमी वैभववाडी तालुक्यात आतापर्यंत ४.३१ टक्के झाले आहे.
..................
‘वय अधिवास’चे ५५ हजारांचे उद्दिष्ट
शाळा तिथे दाखला उपक्रमांतर्गत जिल्ह्यात ५५ हजार ६ दाखले वितरित करण्याचे निश्चित आहे. त्यातील २६ हजार ८०४ दाखल्यांचे आतापर्यंत वितरण झाले. उद्दिष्टाच्या ४८.७३ टक्के काम झाले आहे. सर्वाधिक काम कणकवली तालुक्यात उद्दिष्टांच्या ५३.११ टक्के झाले. त्या पाठोपाठ देवगड तालुक्यात ५२.९९ टक्के झाले. सर्वांत कमी काम आतापर्यंत दोडामार्ग तालुक्यात ३२.४२ टक्के झाले आहे.
....................
कोट
जिल्ह्यात जात आणि वय अधिवास मिळून जिल्हा प्रशासनाने ७७ हजार २६१ दाखले वितरित करण्याचे निश्चित केले आहे. त्यात जातीचे २२ हजार २५५ तर वय अधिवासचे ५५ हजार ६ दाखल्यांचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. हे सर्व दाखले वितरित करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. आजपासून सेवा पंधरवडा अंतर्गत नावीन्यपूर्ण उपक्रमांचा टप्पा सुरू झाला आहे. यामध्ये उर्वरित दाखल्यांचे वितरण करण्याचा प्रयत्न राहणार आहे.
- तृप्ती धोडमिसे, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग
---
शाळा तिथे दाखले वाटप अहवाल

*तालुका*जात प्रमाणपत्र उद्दिष्ट*एकूण वाटप*वय अधिवास प्रमाणपत्र उद्दिष्ट*एकूण वाटप
*दोडामार्ग*२२००*५४८*२६००*८४३
*सावंतवाडी*४०२५*६५४*१००८९*५३२८
*वेंगुर्ले*२६५४*४३४*५३७९*२१९३
*कुडाळ*३२५३*४५७*१०३५६*५२७५
*मालवण*१०२५*३२९*६३१२*२५५२
*कणकवली*३२९८*७२३*९२५१*४९१३
*देवगड*४२६८*७६७*८८९६*४७१४
*वैभववाडी*१५३२*६६*२१२३*९८६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SSC HSC Exam Form : दहावी-बारावीच्या खासगी विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणीसाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

Viral Video : पतीसोबत गरबा खेळताना अचानक कोसळली महिला अन्... हृदयद्रावक व्हिडिओ

Pune News : ११६ कोटीची जमीन नाममात्र दरात हस्तांतरित करा; अजित पवारांच्या जिल्हा प्रशासनाला सूचना

Phulambri News : फुलंब्रीत तिहेरी मृत्यूच्या घटना! विद्युत शॉक, गळफास व विषारी औषधाने तिघांचा बळी

Latest Marathi News Live Update : पंजाबमधील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांनी जाहीर केले पॅकेज

SCROLL FOR NEXT