कोकण

ध्वजपूजन, जयघोष अन् शिवगर्जना

CD

95271

ध्वजपूजन, जयघोष अन् शिवगर्जना

ओटवणेत ‘दुर्गामाता दौड’; ‘शिवप्रतिष्ठान’च्या उपक्रमाला प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. २९ ः येथील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. २८) काढलेल्या ‘दुर्गामाता दौड’ला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ओटवणे कुळघर ते रवळनाथ मंदिरापर्यंत काढण्यात आलेल्या या दुर्गामाता दौडमध्ये महिलांसह युवती, युवक व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
ओटवणे कुळघर येथे या दौडीचा प्रारंभ ओटवणे सरपंच आत्माराम गावकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर ठिकठिकाणी दौडमधील ध्वजाचे महिलांनी पूजन केले. यादरम्यान राष्ट्र व देश भक्तिगीते तसेच दुर्गामाता व शिवाजी महाराजांचा अखंड जयजयकार सुरू होता. रवळनाथ मंदिराकडे ही दुर्गामाता दौड पोहोचल्यानंतर लक्ष्मण लांबर यांनी म्हटलेल्या गारदमुळे रवळनाथ मंदिरचा परिसर शिवमय झाला. यावेळी देशभक्तीपर समूहगीते म्हणण्यात आली. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्रीरंग सावंत यांनी दुर्गामाता दौडचे महत्त्व स्पष्ट केले. रवळनाथ मंदिराला एक प्रदक्षिणा घातल्यानंतर ही दौड ओटवणे सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या दुर्गामातेकडे आली. महाआरतीने दुर्गामाता दौडची सांगता झाली.
यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे दिनेश सावंत यांनी जिजाऊंनी प्रतिवर्ष देवीची उपासना केली, भवानी मातेजवळ स्वतःच्या संसारासाठी नव्हे तर कन्याकुमारी ते काश्मिरपर्यंत पसरलेल्या भारतमातेचा उद्ध्वस्त झालेला संसार दुरुस्त करण्यासाठी आशीर्वाद मागितले. त्यांच्या संस्कारांशी जोडण्याचा उपक्रम म्हणजेच दुर्गामाता दौड असल्याचे सांगितले. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी जिजाऊंनी देवीकडे मागणे मागितले होते. त्या मागणीची परतफेड म्हणून संपूर्ण भारतभर दुर्गामाता दौड नवरात्रोत्सवामध्ये साजरी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. दुर्गामाता दौडचे नियोजन शिवप्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते, ओटवणे नवरात्रोत्सव मंडळाचे प्रभाकर गावकर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे धारकरी राया लांबर, भक्ती पनासे, पूजा पनासे, शर्मिला देवळी, स्नेहा भाईप, जागृती बिले, रसिका मेस्त्री तसेच श्री देव रवळनाथ वाचनालय, नवरात्र उत्सव मंडळ व ओटवणे ग्रामस्थांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SSC HSC Exam Form : दहावी-बारावीच्या खासगी विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणीसाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

Viral Video : पतीसोबत गरबा खेळताना अचानक कोसळली महिला अन्... हृदयद्रावक व्हिडिओ

Pune News : ११६ कोटीची जमीन नाममात्र दरात हस्तांतरित करा; अजित पवारांच्या जिल्हा प्रशासनाला सूचना

Phulambri News : फुलंब्रीत तिहेरी मृत्यूच्या घटना! विद्युत शॉक, गळफास व विषारी औषधाने तिघांचा बळी

Latest Marathi News Live Update : पंजाबमधील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांनी जाहीर केले पॅकेज

SCROLL FOR NEXT