आद्या, रिषभ, आदेश
चित्रकला स्पर्धेत प्रथम
सावंतवाडीतील स्पर्धाः भाजपच्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३० ः भाजप विधानसभा, सावंतवाडीतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे नुकतीच जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. ‘आत्मनिर्भर भारत’, ‘विकसित भारत’, आणि ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाच्या विषयांवर आधारित चित्रे रेखाटण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली.
स्पर्धेत पहिली ते पाचवी (रंगभरण) गटात आद्या नाईक हिने प्रथम क्रमांक पटकावला. वेदा राणे व ध्रुवा सावंत यांनी अनुक्रमे द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावला. दीप स्वार चतुर्थ, मनीष शिंदे पाचव्या क्रमांकाचा मानकरी ठरला. सहावी ते दहावी गटात अनुक्रमे रिषभ मुळीक, तन्मय नेरुरकर, समीक्षा जाधव, श्रेया राऊळ व ऋतुजा जाधव यांनी प्रथम पाच क्रमांक पटकावले.
अकरावी ते खुला गटात आदेश चौकेकर याने प्रथम, अक्षय चौकेकर द्वितीय, नीलेश चव्हाण तृतीय, सर्वेश खांबल चतुर्थ आणि वैभवी कुडाळकर हिने पाचवा क्रमांक पटकावला. पहिल्या गटासाठी अनुक्रमे २०००, १५००, १०००, ५०० व ५०० रुपये, दुसऱ्या गटातील विजेत्यांना २५००, २०००, १००० व १००० रुपये, तसेच तिसऱ्या गटातील विजेत्यांना ५०००, ४०००, ३०००, १५०० व १५०० रुपये बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
सर्व सहभागी तसेच बक्षीसपात्र स्पर्धकांचे भाजप सावंतवाडीतर्फे अभिनंदन केले आहे. बक्षीसपात्र ठरलेल्या स्पर्धकांना सन्मानपत्र व रोख पारितोषिक समारंभासाठी संपर्क साधला जाईल. त्यांनी येथील भाजप कार्यालयात ओळखीचा पुरावा (आधारकार्ड किंवा शाळेचे ओळखपत्र) दाखवून सन्मानपत्र व रोख पारितोषिक घेऊन जावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी दशरथ मांजरेकर यांच्याशी संपर्क साधावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.