कोकण

दाखले वाटपाचा उपक्रम समाजाभिमुख

CD

swt303.jpg
95597
कुडाळः क.म.शि.प्र. मंडळाच्या इंग्रजी माध्यम शाळेच्या विद्यार्थ्यांना दाखल्यांचे वाटप करताना तहसीलदार वीरसिंग वसावे. बाजूला सागर तेली, श्री. जाधव आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)

दाखले वाटपाचा उपक्रम
समाजाभिमुखः वसावे
कुडाळ इंग्रजी शाळेत ४९ विद्यार्थ्यांना दाखले
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ३०ः सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनामार्फत ‘शाळा तिथे दाखला’ उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याला कुडाळ तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. दाखले वितरण शाळा-शाळांमधून होत असल्याने विद्यार्थी आणि पालकांचा वेळ वाचत आहे. विद्यार्थ्यांना वितरित केलेले दाखले महत्त्वाचे आहेत, ते सांभाळून ठेवा, असे आवाहन कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी केले.
क.म.शि.प्र. मंडळाच्या इंग्रजी माध्यम शाळेच्या विद्यार्थ्यांना दाखल्यांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी श्री. वसावे बोलत होते. यावेळी प्रशासनाच्या वतीने एकूण ४९ दाखले विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव, सागर तेली, मुख्याध्यापिका एस. एस. कामत उपस्थित होते. यावेळी एकूण ४९ दाखल्यांचे वितरण करण्यात आले.
यावेळी तहसीलदार वसावे यांनी, सेवा पंधरवड्यात राबविण्यात जाणाऱ्या या उपक्रमाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. हे दाखले पुढील शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी महत्त्वाचे आहेत. ते सांभाळून ठेवा. प्रशासनाच्या वतीने तुम्हाला शाळेत येऊन हे दाखले वितरित केले जात असल्याने तुमचा आणि तुमच्या पालकांचाही वेळ वाचतो आहे. तो वेळ अभ्यास करण्यासाठी घालवा. याचा फायदा भविष्यात निश्चितच होईल, असे त्यांनी सांगितले.
स्वागत मुख्याध्यापिका एस. एस. कामत यांनी, सूत्रसंचालन श्रीमती जोशी यांनी केले. आभार शिक्षक श्रीयुत रासम यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accenture Lays Off : 'IT'क्षेत्राला 'AI'चा फटका! , ‘Accenture’ ने 11 हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं

Mumbai Local: लोकल प्रवाशांना होणार फायदा! ७ नवे रेल्वे स्टेशन उभारणार, कुठे आणि कोणते? पाहा सविस्तर

IND vs AUS: हार्दिक पांड्याच्या दुखापतीवर मोठे अपडेट्स! ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळणार की नाही?

Google आता तुमच्या मोबाईलवर ठेवणार नजर! Chrome अन् Gemini मध्ये मोठा बदल, डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी बदला 'ही' एक सेटिंग

Jalgaon News : जळगावमध्ये माजी महापौर ललित कोल्हेंसह आठ जणांना अटक; ऑनलाइन विदेशी नागरिकांची लूट

SCROLL FOR NEXT