- rat३०p१९.jpg-
P२५N९५६५३
रत्नागिरी ः तालुक्यातील फणसोप विद्यालयात झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना दाखल वितरित करताना उपविभागिय अधिकारी.
फणसोपमध्ये विद्यार्थ्यांना दाखल्यांचे वाटप
सेवा पंधरवडा उपक्रम ; पाच विद्यार्थ्यांना मदत
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३० ः सेवा पंधरवडा कार्यक्रमांतर्गत फणसोप महसूल मंडळात शाळा तेथे दाखला अभियान राबविण्यात आले होते. त्यामध्ये १५१ विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
सेवा पंधरवडा कार्यक्रमांतर्गत नावीन्यपूर्ण उपक्रमात फणसोप मंडळात शाळा तेथे दाखला अभियान राबविण्यात आले आहे. काल (ता. २९) घेण्यात आलेल्या शिबिरात अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील, निवासी नायब तहसीलदार माधवी कांबळे, लक्ष्मी केशव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कमलाकर साळवी, प्राचार्य नेत्रा राजेशीर्के, रितेश साळवी, मिलिंद कांबळे, समद भाटकर, राकी चौगुले यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. या शिबिराला १५० ते २०० नागरिक उपस्थित होते. या नावीन्य पूर्ण उपक्रमात फणसोप मंडळाच्यावतीने श्री लक्ष्मी केशव महाविद्यालय कसोप-फणसोपमधील गरीब विद्यार्थी, एक पालक असलेले विद्यार्थी यांची वर्षभराचे प्रवेश शुल्क ११ हजार ६०० रुपये भरण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.