95695
ओझरम तीर्थवाडीत
आदिशक्तीचा जागर
तळेरे ः विठ्ठल रखुमाई मंदिर, ओझरम तीर्थवाडी येथे रुक्मिणी महिला मंडळ तीर्थवाडी यांच्या पुढाकाराने श्री देवी तुळजा भवानीचा जागर मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्त रोज धार्मिक कार्यक्रमांसह विविध कार्यक्रम सुरू आहेत. रोज देवीला वस्त्र परिधान, अलंकार, हार-फुलांची सजावट, नैवेद्य, आरती, प्रसाद, सायंकाळी हरिपाठ, रात्री रासगरबा, महिलांचे भजन, फॅन्सी ड्रेस अशा भरगच्च धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मंडळाच्या सदस्या दिव्या राणे, पूजा राणे, दुर्वा राणे, रक्षंदा राणे-पाटील, दीपाली राणे, शिल्पा राणे, देवयानी राणे, सुचित्रा राणे, वनिता धुरी, सुषमा राणे आदींचा मोठा सहभाग आहे.
--------
95598
कुडाळ येथे
उद्या कीर्तन
कुडाळ ः येथील श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळातर्फे गुरुवारी (ता. २) रात्री ९ वाजता विजयादशमीनिमित्त श्री देव कुडाळेश्वर मंदिर येथे राष्ट्रीय कीर्तनकार संदीपबुवा मांडके रामदासी यांचे कीर्तन आयोजित केले आहे. कीर्तनाचे कथानक ‘वरवरदेश्वर चरित्र’ अर्थात ‘पार्वती सांत्वन चरित्र’ आहे. सर्व कीर्तन रसिकांनी कीर्तनाला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.