कोकण

मटण-मच्छीमार्केट गाळ्यांचा तीस वर्षांसाठी लिलाव

CD

rat30p27.jpg-
95668
चिपळूण ः नगरपालिकेच्या मटण व मच्छी मार्केटला केलेली रंगरंगोटी.
------------------
मटण-मच्छीमार्केट गाळ्यांचा
तीस वर्षांसाठी लिलाव
चिपळुणात २० वर्षांच्या रखडलेल्या प्रकल्पाला गती; लोकार्पणाची तयारी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३०ः गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या मटण व मच्छीमार्केट इमारतीच्या लोकार्पणाची तयारी नगरपालिकेकडून सुरू आहे. हा प्रकल्प २० वर्षे रखडल्याने व्यापारी या सुविधेपासून वंचित होते. आता याची रंगरंगोटी सुरू झाली असून पुढील ३० वर्षाच्या मुदतीसाठी लिलाव प्रक्रिया करण्यात येणार आहे.
या इमारतीला रंगरंगोटी करून नवा साज चढवण्यात आला आहे. या कामावर माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी आक्षेप घेत स्ट्रक्चर ऑडिट प्रमाणे दुरुस्तीचे काम करण्याची मागणी केली होती. मात्र त्याची दखल न घेताच तात्पुरती दुरुस्तीची कामे केली जात आहेत. शिवाय लवकरच या इमारतीमधील गाळ्यांची लिलाव प्रक्रिया राबविण्याची प्रक्रिया देखील प्रशासनाकडून सुरू आहे.
साधारणतः २००६ मध्ये मटण व मच्छीमार्केटच्या इमारतीचे काम हाती घेण्यात आले. त्यानंतर काही वर्षातच हे काम पूर्ण करण्यात आले. मात्र अंतिम टप्प्यातील काही कामे बारगळी. त्यामुळे या इमारतीला अखेरपर्यत बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळाला नाही. परिणामी २० वर्षे हा प्रकल्प रखडला. काही महिन्यांपूर्वी आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत संबंधित व्यापाऱ्यांची बैठक घेतली होती. बैठकीत व्यापाऱ्यांना आवश्यक असलेल्या सोयी सुविधा नगरपालिकेकडून दिल्या जातील, मात्र व्यापाऱ्यांनी आधी लिलावात सहभागी होण्याचा सूचना मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी केल्या होत्या. त्यानुसार व्यापाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली होती.
याविषयी माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी लिलाव प्रक्रियेसाठी ३० वर्षांची मुदत ठेवल्याने आक्षेप घेतला. याशिवाय स्ट्रक्चर ऑडिटप्रमाणे काम करणे आवश्यक असल्याची मागणी केली होती. मात्र पालिकेकडून या इमारतीच्या दुरुस्तीचे काम घाईघाईने पूर्ण करत रंगरंगोटी देखील करण्यात आली. आता लवकरच या इमारतीतील गाळ्यांच्या लिलाव प्रक्रियेची तयारी देखील सुरू केली आहे.

कोट
आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत व्यापाऱ्या समवेत या प्रकल्पाची चर्चा केली होती. त्यानुसार दुरुस्तीची कामे केली जात आहेत. बैठकीत ठरल्याप्रमाणे पालिकेने कार्यवाही सुरू केली असून लवकरच लिलाव प्रक्रिया देखील राबविण्यात येणार आहे.
- मंगेश पेढांबकर, प्रशासकीय अधिकारी, चिपळूण पालिका

कोट
मटण व मच्छीमार्केट इमारतीची स्ट्रक्चर ऑडिटप्रमाणे दुरुस्ती केली जात नाही. केवळ वरवरची दुरुस्ती करून व्यापाऱ्यांची फसवणूक केली जात आहे. याबाबत लवकरच न्यायालयीन स्तरावर दाद मागणार आहे.
- इनायत मुकादम, माजी नगरसेवक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Decision on Savings Schemes : PPF, KVP, SSY सह अनेक बचत योजनांच्या व्याज दरांबाबत सरकारने घेतला निर्णय!

एकुलती एक लेक अन् दुसरं लग्न... नवऱ्याच्या आजारपणाबद्दल सांगितल्यावर काय म्हणालेले अभिज्ञाचे आई-वडील?

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली दुर्गामातेची आरती

Accenture Lays Off : 'IT'क्षेत्राला 'AI'चा फटका! , ‘Accenture’ ने 11 हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं

Mumbai Local: लोकल प्रवाशांना होणार फायदा! ७ नवे रेल्वे स्टेशन उभारणार, कुठे आणि कोणते? पाहा सविस्तर

SCROLL FOR NEXT