प्रश्न मंजूषामध्ये साडवलीतील बने स्कूलचे वर्चस्व
स्वस्तिक युवा प्रतिष्ठान ; तालुक्यातील १२ शाळांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
साडवली, ता. १ ः देवरुख येथील स्वस्तिक युवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित तालुकास्तरीय सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता स्पर्धा आणि क्विझ कॉम्पिटिशनमध्ये पी. एस. बने स्कूलने वर्चस्व राखले. या स्पर्धेत तालुक्यातील बारा शाळांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता.
साडवली येथील माटे-भोजने सभागृहात अत्यंत उत्साहात पार पडली. या अभिनव स्पर्धेचा उद्घाटन सोहळा सामाजिक कार्यकर्ते मदन मोडक, आशा ज्वेलर्सचे मालक केशव नार्वेकर, व माजी नगराध्यक्ष नीलेश भुरवणे यांच्या हस्ते झाला. पारच्या सत्रात आमदार शेखर निकम, माजी जि. प. अध्यक्ष रोहन बने, व माजी उपनगराध्यक्ष अभिजित शेट्ये यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी आमदार निकम यांनी स्पर्धेबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना स्वस्तिक प्रतिष्ठानने अशी बौद्धिक स्पर्धा दरवर्षी आयोजित करावी, असे आवाहन केले. त्यांनी संकल्पनेची भरभरून स्तुती केली. या स्पर्धेतील विजेत्यांना कोकण कनेक्टचे गणेश खामकर यांनी आकर्षक चषक देऊन सन्मानित केले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्वस्तिक युवा प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेची चाचणी घेणारे हे एक उत्कृष्ट व्यासपीठ ठरले असून, तालुक्यातील पालक व नागरिकांमध्ये या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाविषयी सकारात्मक चर्चा सुरू आहे.
---
चौकट
असा आहे निकाल
सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता (लेखी परीक्षा ः ५ ते ७ वी गट) : अर्णव योगेश शिंदे, पूर्वी लक्ष्मण बेले (पी. एस. बने स्कूल), दिव्यराज योगेश शिंदे (जि. प. शाळा, देवरुख क्र. ४). ८ ते १०वी गट ः आदित्य खडके, ओम विलास कनार, चिन्मय प्रकाश टिपुगडे (पी. एस. बने स्कूल), मुग्धा अरविंद कुलकर्णी (न्यू इंग्लिश स्कूल, देवरुख). क्विझ कॉम्पिटिशन ५ ते ७ वी गट ः बुरंबी हायस्कूल, पी. एस. बने, जि. प. शाळा, देवरुख क्र. ४ आणि साडवली मीनाताई ठाकरे शाळा, जि. प. शाळा कांगणेवाडी. ८ वी ते १० वी गट ः मीनाताई ठाकरे शाळा, देवरुख न्यू इंग्लिश स्कूल, निवे हायस्कूल.
---