कोकण

चिपळुणातील वसतिगृहात प्रवेशाचे आवाहन

CD

चिपळुणातील वसतिगृहात
प्रवेशाचे आवाहन
रत्नागिरी ः ‘चिपळूण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र इच्छुक मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाइन अथवा ऑफलाइन अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा,’ असे आवाहन प्रभारी गृहपाल रवींद्र कुमठेकर यांनी केले आहे. आठवीपासून पुढे शिकणाऱ्या, कनिष्ठ-वरिष्ठ महाविद्यालय, व्यावसायिक-बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमांत शिकणाऱ्या व स्थानिक नसलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. वसतिगृहात प्रवेशित मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रचलित शासन निर्णयानुसार निवास-भोजन व्यवस्थेसह गणवेश व अन्य शैक्षणिक सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या जातात.
------
भटक्या कुत्र्यांच्या
बंदोबस्ताची मागणी
खेड ः शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर तसेच महाड नाका परिसरात भटक्या कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. या कुत्र्यांचा नागरिकांना त्रास होत असून, कधीही ते बालके, महिला, पुरुषांवर हल्ला करतात. या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील रहिवासी केतन आंब्रे व सहकाऱ्यांनी खेड पालिकेकडे निवेदनाद्वारे केली. काही दिवसांपूर्वी महाड नाका येथे ११ वर्षीय मुलावर भटक्या कुत्र्याने जीवघेणा हल्ला केला. या घटनेनंतर त्या मुलाला तातडीने खेड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
--------

‘एलटीटी’ स्कूलमध्ये
आंतरशालेय नृत्य स्पर्धा

खेड ः खेड लायन्स एज्युकेशन सोसायटी संचलित एल. टी. टी. इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त तालुकास्तरीय आंतरशालेय नृत्य स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेसाठी भरणे येथील लक्ष्मी मसाले इंडस्ट्रीजचे मालक विलास बुटाला, उत्तम जैन, नागेश बोंडले, प्रेमल चिखले, माजिद खतीब, समन्वयक सेबास्टियन जॉय, समन्वयक एल. सी. मॅडम, मुख्याध्यापक सारंग आदी उपस्थित होते. स्पर्धेतील सहभागी शाळांमधील शिक्षक प्रतिनिधी, तसेच कोरिओग्राफर कादंबरी वैद्य यांचा सन्मान करण्यात आला. बहारदार नृत्याविष्कार सादर करत स्पर्धकांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

--------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dussehra Shubh Muhurat 2025 : दसरा पूजनाची सर्वोत्तम वेळ कधी, अन् रावण दहनानंतर कोणतं काम करावं?

Vani News : आदिमाया सप्तशृंगी मातेच्या कीर्तीध्वजाची भव्य मिरवणूक.. गडाच्या शिखरावर मध्यरात्री कीर्तीध्वज डौलात फडकणार....

वेळापत्रक आरक्षणाचे! झेडपीच्या गटाची अन्‌ पंचायत समित्यांच्या गणांची १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत; जिल्हाधिकारी पाठविणार एससी, एसटी प्रवर्गातील जागांचा प्रस्ताव

IND vs WI, 1st Test: 'कर्णधार' गिलच्या भारतातील पहिल्याच कसोटीवर पावसाचे काळे ढग? जाणून घ्या हवामान अंदाज

Ravindra Dhangekar News : नीलेश घायवळ प्रकरणावर चंद्रकांतदादा गप्प का? ; रवींद्र धंगेकरांचा सवाल!

SCROLL FOR NEXT