rat1p11.jpg
95916
मंडणगड : पाऊस लांबणीवर जात असल्याने शेतातील तयार पिकांना धोका निर्माण झाला आहे. नुकसानीचे पंचनामे करताना कृषी अधिकारी.
-----------
मंडणगडमध्ये चार महिन्यांत ९५.३० टक्के पाऊस
गतवर्षीपेक्षा कमी नोंद; सप्टेंबरमधील मुसळधारेने शेतीवर विपरित परिणाम
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १ः तालुक्यात यंदा मॉन्सूनने दमदार हजेरी लावली असली, तरी पावसाचा हंगाम लांबणीवर गेला आहे. २८ सप्टेंबरअखेर तालुक्यात ३७१३.५७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून हा वार्षिक सरासरीच्या ९५.३० टक्के आहे.
गत वर्षी याच दिवशी (२८ सप्टेंबर २०२४) ४४१०.१८ मिलिमीटर पाऊस पडला होता, जो सरासरीच्या ११३.२७ टक्के होता. त्यामुळे यंदा पावसाचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. मेच्या दुसऱ्या आठवड्यातच पावसाला सुरुवात झाली होती. मात्र, सुरुवातीला झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप पिकांची पेरणी वेळेवर होऊ शकली नाही. पेरणी उशिरा झाल्याने पिकांचा हंगाम लांबणार असल्याचे चित्र आहे. अनेक शेतकऱ्यांची शेती व भाजावणीची कामे अर्धवट राहिली होती.
कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, यंदा तालुक्यात २७०० हेक्टर क्षेत्रात भात लागवड झाली आहे. मात्र सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे भातासह नाचणी व अन्य पिकांवर विपरित परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पक्षी, पशू व किटकांच्या हालचालींवरून परतीच्या पावसाचे संकेत मिळत असले, तरी हवामान खात्याने १० तारखेपर्यंत पाऊस लांबणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
कोट
मेच्या पहिल्या आठवड्यातच पाऊस सुरू झाल्याने पेरणी पूर्ण करताना शेतकऱ्याला खूप परिश्रम करावे लागले. आता धान्य तयार झाले, तरी पाऊस कमी होत नसल्याने चिंतेचे ढग गडद झाले आहेत. पाणथळ शेतात पिकं आडवी होत आहेत. दाणे पाण्यात भिजून कुजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उत्पादनाचे गणित कोलमडून गेल्यास शेतकरी वर्ग नाऊमेद होईल.
- संतोष पोस्टुरे, शेतकरी, तुळशी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.