rat३p७.jpg
९६१०४
चिपळूणः सायकलने शाळेत येणे-जाणे करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करताना मुख्याधिकारी विशाल भोसले.
चिपळूण नगरपालिकेत ‘सायकल दिवस’ उपक्रम
पर्यावरणपूरक जीवनशैलीसाठी जागृती ; प्रेम चोरगेचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३ ः महाराष्ट्र शासनाच्या ''माझी वसुंधरा अभियान ६.०'' अंतर्गत चिपळूण नगरापालिकेमार्फत पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी काल (ता. १) ‘सायकल दिवसानिमित्त शहरात सायकलफेरी काढण्यात आली. मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.
''वायू'' कृतिबिंदूअंतर्गत नागरिकांना सायकलचा वापर करण्यास प्रवृत्त करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या दिवशी सर्व नागरिक, अधिकारी व कर्मचारी यांनी खासगी वाहनांचा वापर टाळून सायकल किंवा पायी कार्यालयात हजेरी लावली. या उपक्रमाची सुरवात काल सकाळी ८ वाजता करण्यात आली. ‘स्ट्रावा’ या मोबाईल अॅपद्वारे सर्वांना आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व माहिती देण्याचे काम अभियान समन्वयक सूरज सकपाळ यांनी केले. या उपक्रमात नियमितपणे शाळेत सायकलने येणाऱ्या सुरेश दामोदर गद्रे इंग्लिश मीडियम स्कूलच्या १०वी अ चा विद्यार्थी प्रेम चोरगे याला मुख्याधिकारी भोसले यांच्या हस्ते ''माझी वसुंधरा मित्र'' प्रमाणपत्र आणि फुलाचे रोपटे देऊन गौरवण्यात आले. हा उपक्रम मुख्याधिकारी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली, कार्यालय अधीक्षक रोहित खाडे, उद्यान विभागप्रमुख व माझी वसुंधरा अभियान नोडल अधिकारी प्रसाद साडविलकर तसेच इतर नगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने करण्यात आली.
चौकट
अशी काढली फेरी
सर्व सायकलस्वारांनी चिपळूण पालिका कार्यालय येथून सायकलफेरीला सुरवात केली. ही फेरी बाजारपेठ रोड-गांधीचौक-नाथपै चौक-नवीन मटणमार्केट- खेडेकर संकुलमार्गे परत कार्यालयात सांगता झाली. त्यामध्ये अनेक नागरिक, विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी पायी चालत सहभागी झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.