rat3p8.jpg -
96105
चिपळूण : तालुक्यातील खांदाटपाली ते निरबाडे रस्त्याची खड्ड्यांमुळे झालेली दुरवस्था.
खांदाटपाली ते निरबाडे रस्त्याची चाळण
वाहनचालकांची कसरत; जवळचा मार्ग असल्याने वाहनांची गर्दी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३ : तालुक्यातील खांदाटपाली ते निरबाडे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. ‘रस्ता खड्ड्यात की खड्ड्यात रस्ता’ अशी स्थिती आहे. खड्डे चुकवताना वाहनचालकांची दमछाक होत आहे तसेच या मार्गावरील पुलावरही तीच परिस्थिती असल्याने वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. या रस्त्यांचे डांबरीकरण लवकरात लवकर करावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.
कळंबस्ते-धामणंद मार्गावरील खांदाटपाली ते निरबाडेमार्गे काडवली तसेच पंधरागावकडे जाण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे. त्यामुळे बहुतांशी वाहनचालक या मार्गाचा सर्रास वापर करतात. गेल्या काही महिन्यांपासून खांदाटपाली ते निरबाडे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसात तर या खड्ड्यांमधून पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्डे चुकवणे अवघड होते. वाहने खड्ड्यात आपटून चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. चढ अथवा उतारातही हीच परिस्थिती असून खडीदेखील मोठ्या प्रमाणात वर आली आहे. त्यावरून दुचाकी घसरून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
या मार्गावरील पुलावरदेखील हीच परिस्थिती असून, पावसाळ्यापूर्वी येथील ग्रामस्थांनी काही खड्डे सिमेंट काँक्रिटने बुजवले आहेत; मात्र, अन्य खड्डे ''जैसे थे'' असल्याने या पुलावरून वाहने चालवणे धोकादायक झाले आहे. हा पूल जुना झाला असून, त्याची डागडुजी करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून जोर धरू लागली आहे. चारगावची ग्रामदेवता श्री रामवरदायिनी मंदिरापासून ते काडवलीकडे जाणाऱ्या पुलावरदेखील तशीच परिस्थिती आहे. २१ जुलै २०२१च्या महापुरात या पुलाचे रेलिंग तुटलेले असून, अजूनही या पुलाची डागडुजी करण्यात आलेली नाही. हा पूलदेखील काही वर्षांपूर्वी बांधण्यात आला असून, नव्याने पूल बांधण्याची गरज निर्माण झाली आहे. या पुलावरील खड्डे चुकवताना रेलिंग नसल्याने वाहन नदीत कोसळण्याचा धोका नाकारता येत नाही.
कोट
खांदाटपाली ते निरबाडे रस्त्याची चाळण झाली आहे. हा मार्ग खड्डेमय तितकाच धोकादायक बनलेला असून, शासन-प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे.
- अयुब चौगले, मुसाड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.