संगमेश्वर–पाटण घाटमार्ग काम प्राधान्याने करा
मनीषा पाटणकर-म्हैसकर यांच्या सूचना; ४६.६०० पैकी २६.६०० किमी एकेरी रस्ता पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ३ ः तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गापासून सुरू होणाऱ्या संगमेश्वर–पाटण घाटमार्ग कामाला गती मिळावी म्हणून घाटमार्ग समन्वय समितीचे समन्वयक संतोष येडगे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनिषा पाटणकर-म्हैसकर यांची मंत्रालयात भेट घेतली. सार्वजनिक बांधकाम विभाग या घाटमार्ग कामासाठी सकारात्मक असून, या घाटमार्ग मंजुरीचे प्रशासकीय काम प्राधान्याने करण्याच्या तातडीच्या सूचना म्हैसकर यांनी सचिव संजय दशपुते यांना केल्या आहेत.
संगमेश्वर ते पाटण या ४६ किमीच्या सर्व्हेक्षणाचे काम मोनार्च सर्व्हेयर्स ॲण्ड इंजिनिअरिंग कन्सल्टंट लि. (Monarch Surveyors And Engineering Consultants LTD) या कंपनीला देण्यात आले आहे. घाटमार्ग कामाचा डीपीआर शासनाला सादर करण्याची जबाबदारी या कंपनीकडे देण्यात आली आहे. विहित मुदतीत या कंपनीने डीपीआर शासनाला सादर करून प्रशासकीय मान्यता प्रक्रिया पार पाडत या आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कामाला सुरवात व्हावी, अशी विनंती येडगे यांनी केली.
संगमेश्वर ते चाफेर (पाटण) हा एकूण ४६.६०० किमीचा रस्ता आहे. यापैकी २६.६०० किमी एकेरी रस्ता तयार असून, फक्त २० किमी रस्ता तयार करावा लागणार आहे. रत्नागिरी जिल्हा हद्दीतील ५.५०० किमी तर सातारा जिल्हा हद्दीतील १४.६०० किमी अंतरामधील रस्ता शिल्लक आहे. २०.१०० किमी एकेरी रस्ता पूर्ण केल्यास या मार्गावरील वाहतूक सुरू होणार आहे. संगमेश्वर–पाटण घाटमार्ग डीपीआरसाठी महाविकास आघाडी सरकारने २०१८ या अर्थसंकल्पीय वर्षात ५ कोटी रुपयांची तरतूद केली होती. संगमेश्वर-पाटण घाटमार्ग कामाचे भूमिपूजन १९९९ मधील युती सरकारच्या काळात झाले होते.
चौकट
संगमेश्वर, रत्नागिरीतील गावांना फायदा
संगमेश्वरपासून सुरू होणाऱ्या या घाटमार्गाचा हातखंबा, रत्नागिरी, बावनदी, आंबेड, कोसुंब,करंबेळे, वाशी, धामणी, तुरळ, आरवली, कसबा, कारभाटले, नायरी, अणदेरी, मासरंग, चिखली, तांबेडी, शेनवडे, शेंबवणे, कडवई, कुंभारखाणी, कुचांबे, राजिवली, कुटगिरी, रातांबी, कोंडीवरे, माखजन, करजुवे, असुर्डे, नांदगाव, येगांव, कुटरे, तळवडे, गोवळ, पाथे आदी आणि खाडीपट्ट्यातील, सह्याद्री रांगांमध्ये वसलेल्या असंख्य गावे आणि परिसरातील गावांमधील लाखो नागरिकांना या मार्गाचा फायदा होणार आहे. पुणे, सातारा या ठिकाणी जाण्यासाठी हा मार्ग जवळचा ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.