कोकण

नारळ, सुपारी, केळीच्या बागा भुईसपाट

CD

96275
96276


नारळ, सुपारी, केळीच्या बागा भुईसपाट

तळकटमध्ये हत्तींचा धुडगूस; वनविभागाचा ढिसाळ कारभार, स्थानिक संतप्त

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ३ ः कोलझर परिसरात दाखल झालेल्या हत्तीच्या कळपाने काल (ता.२) रात्री तळकट येथे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. नारळ, सुपारी, केळी उत्पादन देणारी आदी झाडे भुईसपाट केली. गस्त घालणाऱ्या वन पथकाच्या ढिसाळ कार्यपद्धतीमुळे नुकसानाची तिव्रता वाढत असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. पाचही हत्तींचा कळप याच भागात तळ ठोकून आहे.
मागील काही दिवसांपासून पाच हत्तींच्या कळपाने घोटगे गावात शेतकऱ्यांच्या बागायतीमध्ये थैमान घातले होते. आता तोच कळप पुन्हा कोलझर गावात दाखल झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून त्यांनी बागायतीत शिरून नासधूस सुरु केली आहे. उत्पन्न देणारी माड, सुपारी, केळी आदी झाडे हत्तींच्या भक्षस्थानी पडू लागली आहेत. डोळ्यादेखत दिवसागणिक होणारे लाखोंचे नुकसान पाहता शेतकरी भविष्याच्या चिंतेने व्यतीत झाला आहे. दिवसेंदिवस नुकसानीचे सत्र वाढत असून उभ्या केलेल्या बागायती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. याआधी सहा हत्तींचा कळप दोडामार्ग तालुक्यातील कोलझर, शिरवल, तळकट, झोळंबे, केर, मोर्ले, हेवाळे, बाबळवाडी, घोटगे, घोटगेवाडी, खराडी, बांबर्डे आदी ठिकाणी वास्तव्याला होता. त्यावेळी त्या भागात कोट्यावधीचे नुकसान झाले होते. काही दिवस नुकसान करून स्थलांतर करणाऱ्या आणि ठराविक काळाने परत येणाऱ्या या कळपासमोर वनपथक निष्क्रिय ठरले आहे. मध्यंतरी सहापैकी ओंकार हा टस्कर गोवामार्गे सावंतवाडी तालुक्यात दाखल झाला; मात्र उर्वरीत पाच हत्तींनी पुन्हा कोलझर परिसर गाठला आहे. यात गणेश हा टस्कर, मादी आणि तीन पिल्ले यांचा समावेश आहे.
या कळपाने काल रात्री तळकट येथे हल्लाबोल केला. तेथील नारायण ऊर्फ दाजी देसाई यांची सुमारे वीस वर्षे जुनी १५ नारळाची झाडे, ५ वर्ष जुनी सुमारे ५० पोफळी, केळी असे आतापर्यत नुकसान केले आहे. काल रात्री त्यांची उर्वरीत बाग या कळपाने भूईसपाट केली. गेले दोन दिवस असेच नुकसान कोलझरमध्ये केले. असाच प्रकार सुरु राहिल्यास या भागातील बागायती नष्ट होऊन स्थानिक उद्ध्वस्थ होण्याची भीती आहे.
-------------------
गस्तीचा उपयोग काय?
वनविभागाने हत्तींकडून होणारे नुकसान नियंत्रणात ठेवण्यासाठी लाखो रुपये खर्च करुन गस्ती पथक तैनात केले आहे; मात्र नियोजनाअभावी हे पथक निरुपयोगी ठरत असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. याबाबत नुकसानग्रस्त शेतकरी नारायण ऊर्फ दाजी देसाई म्हणाले, ‘‘सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान दिवसा ड्युटी असलेले कर्मचारी निघून जातात. दुसरे पथक रात्री नऊच्या दरम्यान येते काल आमच्या बागेत याच काळात हत्तींनी नुकसान केले. हे पथक वस्तीजवळ राहून फटाके फोडण्याच्या पलिकडे फारसे काही करत नाही. त्यामुळे गस्तीचा उपयोग काय?’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump ultimatum : ट्रम्प यांचा हमासला ४८ तासांचा अल्टिमेटम! ; म्हणाले, ‘’आता जर ऐकलं नाहीतर...’’

Pune Crime : कुख्यात गुंड नीलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करणार - पोलिस आयुक्त अमितेश कुमार

Mehbooba Mufti Statement : ‘’लडाख, POKमध्ये Gen-Z… ’’ ; मेहबूबा मुफ्तींनी केलं मोठं विधान!

Gautami Patil News : गौतमी पाटीलच्या अडचणी वाढणार? ; पुणे पोलिसांनी बजावली नोटीस!

IND vs AUS: विराट कोहली आणि रोहित शर्माचे पुनरागमन होणार? ऑस्ट्रेलियाविरुद्ध ODI मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा कधी? तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT