कोकण

विषारी द्रव्य पिल्याने तरुणाचा मृत्यू

CD

विषारी द्रव्य पिल्याने
तरुणाचा मृत्यू
रत्नागिरीः दारूच्या नशेत आंबा फवारणीचे विषारी द्रव्य प्यायलेल्या तरुणाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. महेश बळीराम ठीक (वय ३५, रा. वांद्री, ता. संगमेश्वर) असे त्या तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. ३) सकाळी सातच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठीक यांने नशेत बुधवारी (ता. १) रात्री आठच्या सुमारास विषारी द्रव्य केले होते. तत्काळ नातेवाईकांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना आज सकाळी सातच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
......
कोतवडेत मोटारीची
वृद्धेला धडक
रत्नागिरीः कोतवडे येथे प्राथमिक आरोग्यकेंद्रात जाणाऱ्या वृद्ध महिलेला एका मोटारीने धडक दिली. या अपघातात वृद्ध महिला जखमी झाली. अधिक उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. मोटारचालकाविरुद्ध ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. शारदा सखाराम लोखंडे (वय ७२, रा. सड्ये, रत्नागिरी) असे जखमी महिलेचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. ३) सकाळी सव्वाअकराच्या सुमारास कोतवडे येथील प्राथमिक आरोग्यकेंद्र रस्त्यावर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शारदा लोखंडे या कोतवडे येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचारासाठी रस्त्याने जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या मोटारीने त्यांना धडक दिली.
.......
आगीचा भडका उडून
महिला भाजली
रत्नागिरीः जेवण करण्यासाठी चूल पेटवत असताना रॉकेल ओतल्यानंतर आगीचा भडका उडून महिला ६० टक्के भाजली. उपचारासाठी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे. अक्षदा संतोष अंकुशराव (वय ४७, रा. किरबेट साखरपा, ता. संगमेश्वर) असे भाजलेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता.१) सकाळी साडेसातच्या सुमारास किरबेट येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अक्षदा अंकुशराव या सकाळी साडेसातच्या सुमारास चुलीवर जेवण बनवण्यासाठी चूल पेटवत होत्या. रॉकेल ओतून पेटवले असता आगीचा भडका उडून अंगावरील नायलॉनच्या साडीने पेट घेतला. यामध्ये त्या ६० टक्के भाजल्या. त्यांना प्रथम साखरपा आरोग्यकेंद्रात आणि नंतर रत्नागिरीत शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.
----------
सार्वजनिक ठिकाणी
दारू प्यायल्याने गुन्हा
रत्नागिरी ः शहरातील साळवी स्टॉप येथे सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या नेपाळी तरुणाविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. युवराज लोगबहाद्दूर दमाई (वय २२, रा. घोडाघोडी, कैलाली-नेपाळ, सध्या हातखंबा-तारवेवाडी, रत्नागिरी) असे दारु पिलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरूवारी (ता. 2) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास साळवी स्टॉप येथील जलतरण तलावाच्या पाठीमागील इमारतीसमोर निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, युवराज दमाई हा सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत होता. या प्रकरणी महिला पोलिस हेडकॉन्स्टेबल दीपाली साळवी यांनी शहर पोलिसात तक्रार दिली.
........
मनोरुग्णाचा
आकस्मिक मृत्यू
रत्नागिरीः येथील प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्ण नातेवाईक नसल्यामुळे शहरातील शांतीनगर येथील द बॅनियन संस्थेत ठेवले होते. गुरूवारी त्यांना बेशुद्धावस्थेत उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या रुग्णाला तपासून मृत घोषित केले. तुकाराम दगडू पाटील (वय ५५, रा. द बॅनियन संस्था, शांतीनगर-रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना गुरूवारी (ता. २) जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पाटील हे जेवणखाण करून झोपले होते. गुरूवारी पहाटे काळजीवाहक उठवण्यासाठी गेले असता त्यांची हालचाल दिसून आली नाही. तत्काळ त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautami Patil News : गौतमी पाटीलच्या अडचणी वाढणार? ; पुणे पोलिसांनी बजावली नोटीस!

IND vs AUS: विराट कोहली आणि रोहित शर्माचे पुनरागमन होणार? ऑस्ट्रेलियाविरुद्ध ODI मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा कधी? तारीख आली समोर

Prakash Ambedkar : भाजप, आरएसएसच्या विचारसरणीत ‘मदत’ हा शब्दच नाही; ‘वंचित’चे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांची टीका

Pune News : महापालिकेची प्रभाग रचना सोमवारपर्यंत जाहीर होणार

Pune Crime : कुख्यात गुंड नीलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करणार - पोलिस आयुक्त अमितेश कुमार

SCROLL FOR NEXT