कोकण

जेएसडब्ल्यू एनर्जीमुळे मासे मेल्याचा आरोप

CD

-rat३p२९.jpg-
P२५N९६२६७
रत्नागिरी ः नांदिवडे समुद्रकिनारी विषारी पाण्यामुळे मरून पडलेले गोबरा व अन्य मासे.
---------
जेएसडब्ल्यू एनर्जीमुळे मासे मृत
नांदिवडे ग्रामस्थांचा आरोप ः कार्यवाहीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ ः जयगड येथील जेएसडब्ल्यू एनर्जीचा दुष्परिणाम दिसू लागल्याचा आरोप नांदिवडे ग्रामस्थांनी केला आहे. तालुक्यातील नांदिवडे समुद्रकिनारी गोबरा, तावीज, पालू, शितकं, वटिया असे मासे सांडपाण्यामुळे मरून किनारी लागले होते. याचीच पुनरावृत्ती काल पुन्हा नांदिवडे समुद्रकिनारी झाल्याचे उघड झाले आहे. येथील जागरूक मच्छीमार ज्येष्ठ शिवसैनिक जयवंत गजानन आढाव, संतोष सीताराम हळदणकर, देवीदास श्रीरंग हळदणकर यांनी ही बाब जेएसडब्ल्यू एनर्जीचे जनसंपर्क अधिकारी नरेश विलणकर यांना कळविली.
विलणकर यांनी नांदिवडे समुद्रकिनाऱ्याला भेट दिली व मृत्यू पावलेल्या मत्स्यसंपदेची पाहणी केली. १० ते १५ किलो वजनाचे मोठमोठे मासे यामध्ये गोबरे तसेच तावीज, पालू, शितकं असे मासे होते. जिंदलच्या औष्णिक ऊर्जाकेंद्रातून अध्येमध्ये विषारी पाणी नांदिवडेच्या भरसमुद्रात सोडले जाते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे या बाबतीत अजिबात लक्ष नाही असा आरोप करत याबद्दल स्थानिक मच्छीमारांमध्ये तीव्र संताप आहे,असे सांगत जयवंत गजानन आढाव व सहकारी मच्छीमारांनी या विरोधात जनआंदोलन उभे करण्याचे सूतोवाच केले.
जेएसडब्ल्यू एनर्जी कंपनी अशा पद्धतीने स्थानिक मच्छीमारांच्या भविष्याच्या उपजीविकेवर घाला घालत असल्याचा आरोप करत त्याबद्दल शासनाकडून योग्य ती कार्यवाही झाली पाहिजे, असे सर्व स्थानिक मच्छीमारांचे जनतेचे मत आहे. याबद्दल लवकरच शासनदरबारी आवाज उठवण्यात येणार आहे, तत्काळ उपाययोजना न केल्यास मोठे आंदोलन उभारले जाईल, असे स्थानिक मच्छीमारांनी सांगितले.
-----
कोट
नांदिवडे येथे एकाच तटावर मासे मेलेले आहेत. परंतु हे कशामुळे मेले ते अजून स्पष्ट झालेले नाही. कंपनी नेहमी पाणी सोडते. कशामुळे मासे मेले आम्ही नाही सांगू शकत.
- नरेश विलणकर, जनसंपर्क अधिकारी, जेएसडब्ल्यू एनर्जी
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coaching Center Blast: भयंकर! कोचिंग सेंटरमध्ये मोठा स्फोट, दोन विद्यार्थी जागीच ठार, अनेक जखमी, घटनेने खळबळ

Madha Flood Crisis : मुख्यमंत्र्यांकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदतीची आशा : गोपीचंद आमदार पडळकर

Latest Marathi News Live Update : मीरा भाईंदर: थायलंड-म्यानमार सायबर रॅकेटचा पर्दाफाश

FASTag New Rule : आता नाही द्यावा लागणार डबल टोल! 'UPI पेमेंट'ने पैसे वाचणार

KDMC News : 14 गाव, 27 गाव आताच बाहेर काढून त्यांची स्वतंत्र नगरपालिका करा, 27 गाव संघर्ष समिती अध्यक्ष खासदार सुरेश म्हात्रे यांचा इशारा

SCROLL FOR NEXT