कोकण

गोष्ट संयुक्त मनापमानानमध्ये चमकलेला ''अजिंक्य

CD

-rat४p२.jpg-
२५N९६३८१
रत्नागिरी ः संयुक्त मानपमानमध्ये भामिनीची भूमिका साकारणारा अजिंक्य पोंक्षे.
----
संयुक्त मानापमानातून अजिंक्य रसिकांच्या मनात
जिल्ह्यात ६, ७ ला प्रयोग; सूत्रधारासह भामिनीची भूमिका
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ४ ः मराठी रंगभूमीवर १९२१ ला गाजलेल्या संयुक्त मानापमानाची या नाटकाची कथा रसिकांना सांगणाऱ्या गोष्ट संयुक्त मानापमानाची या नाट्यप्रयोगातून सध्या अजिंक्य पोंक्षे, गायक नट म्हणून रसिकांच्या मनात घर करून बसला आहे. पोंक्षे हा संगमेश्वर तालुक्यातील आंबवपोंक्षे गावचा आहे. या नाटकाचे प्रयोग खुद्द चिपळूण, रत्नागिरी या ठिकाणी होत असल्याने जिल्ह्यातून पुढे आलेल्या या कलाकाराचा आविष्कार रसिकांना जवळून पाहायला आणि अनुभवायला मिळणार आहे.
१९२१ पूर्वी संगीत मानापमान हे नाटक बालगंधर्व व केशवराव भोसले स्वतः आपापल्या कंपन्यांतर्फे स्वतंत्र प्रयोग करत असत. १९२१ मध्ये महात्मा गांधीजींनी टिळकांच्या मृत्यूपश्चात ‘टिळक स्वराज्य फंडाची’ घोषणा केली. या वेळी टिळक स्वराज्य फंडासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी केशवराव भोसले व बालगंधर्व यांची भेट घेतली व फंड निर्मितीसाठी केशवराव भोसले व बालगंधर्व यांनी पुढाकार घेत संगीत मानापमान हे नाटक संयुक्तरित्या करण्याचे ठरवले. नंतर याच संगीत नाटकाचे नामकरण झाले ‘संयुक्त मानापमान!’
या नाटकाचे जिल्ह्याच्यादृष्टीने विशेष म्हणजे भामिनीची भूमिका वठवणारा गायक नट संगमेश्वर तालुक्यातील आंबवपोंक्षे येथील आहे. गोष्ट संयुक्त मानापमानाची या नाटकात अजिंक्य हा पहिल्या दोन अंकात सूत्रधाराची भूमिका करत आहे तर पुढे भामिनीची भूमिका करत आहे, जी भूमिका संयुक्त मानापमानात प्रत्यक्ष बालगंधर्वांनी केली होती. अजिंक्य हा अगदी लहान वयापासून गाणे शिकत आहे. वडील दीपक पोंक्षे हे उत्तम गायक, भजनी कलावंत असल्याने त्यांचाच वारसा तो पुढे चालवत आहे. चतुरंग प्रतिष्ठानतर्फे ६ ला चिपळुणात, तर ७ ला रत्नागिरीत प्रयोग होणार आहे.
---------
चौकट
पहिला प्रयोग १९२१ ला
या संयुक्त मानापमानाचा पहिला प्रयोग ८ जुलै १९२१ रोजी झाला. त्या वेळी सर्वसाधारण तिकिटाचा दर होता १ रुपये, २ रुपये, ३ रुपये. पण संगीत संयुक्त मानापमानाचा तिकीटदर होता तब्बल १०० रुपये. त्या वेळी सोनं केवळ १५ रुपये तोळा आणि पहिल्याच प्रयोगाला १६ हजार ८०० रुपये उत्पन्न मिळाले. मराठी रंगभूमीवरील या नाटकाने जणू इतिहासच रचला. त्या काळात मराठी रंगभूमीवर अनभिषिक्त अधिराज्य गाजवलेल्या दोन मंडळींनी संगीत मानापमान या नाटकात एकत्र काम केल्यानेच या नाटकाचे संयुक्त मानापमान नामकरण झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

Latest Marathi News Live Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT