96421
महाराष्ट्र रोजगारनिर्मितीत देशात अग्रस्थानी
पालकमंत्री राणे ः सिंधुदुर्गात लिपिक-टंकलेखक, अनुकंपा उमेदवारांची नियुक्ती
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ४ ः ‘‘राज्यातील कोणताही तरुण बेरोजगार राहू नये, प्रत्येकाच्या हातांना काम मिळाले पाहिजे, हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार आहे. राज्याने आज दहा हजारांहून अधिक पात्र उमेदवारांना नोकऱ्या देऊन ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. हा कार्यक्रम केवळ रोजगार वितरणाचा नसून, जनतेवरील शासनाचे प्रेम, जबाबदारी आणि संवेदनशीलतेचे प्रतीक आहे,’’ असे प्रतिपादन पालकमंत्री नीतेश राणे यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शिफारस केलेल्या लिपिक-टंकलेखक पदावरील उमेदवारांना तसेच नवीन अनुकंपा धोरणानुसार निवड झालेल्या उमेदवारांना पालकमंत्री राणे यांच्या हस्ते नियुक्ती आदेशाचे वितरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, उपवनसंरक्षक मिलिश शर्मा, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, पी. एम. विश्वकर्मा समितीचे सदस्य प्रभाकर सावंत आदी अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री राणे म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र गुंतवणुकीत देशात अग्रस्थानी आहे. यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होत आहे. शासन जनतेच्या हितासाठी अनेक उपक्रम राबवत असून, आज मिळालेली नोकरी ही शासनसेवेतून समाजसेवा करण्याची सुवर्णसंधी आहे. आपण आता प्रशासनाचा भाग झाला आहात. शासनाची सेवा हीच जनसेवा, या भावनेने कार्य करा.’’
जिल्हाधिकारी धोडमिसे म्हणाल्या, ‘‘राज्य शासन विविध लोकाभिमुख निर्णय घेत असून यामुळे अनेकांना कल्याणकारी योजनांचा लाभ होत आहे. आज अनुकंपा तत्त्वावरील अनेक उमेदवारांना आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लिपिक टंकलेखक उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात येत आहेत. या अंतर्गत जिल्ह्यामध्ये अनेक उमेदवारांना नियुक्ती मिळणार असल्याने जिल्हा प्रशासनाला देखील बळकटी येणार आहे.’’ राजश्री सामंत यांनी सूत्रसंचालन केले. चैताली सावंत यांनी आभार मानले.
........................
अनुकंपा धोरणानुसार नियुक्ती
जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय -८, अधीक्षक अभियंता दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प-२, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक-१, सहसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय-१, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय-७, सावंतवाडी नगरपरिषद-१, जिल्हा परिषद-५.
.......................
लिपिक, टंकलेखक पदी नियुक्ती
जिल्हाधिकारी कार्यालय (महसूल)-३७, जिल्हाधिकारी कार्यालय (पुरवठा)-१८, सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास विभाग-१, महिला व बालविकास विभाग-३, वैद्यकीय शिक्षण व आयुष-१, राज्य उत्पादन शुल्क-१, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी-८, नगर रचना-१, उपवनसंरक्षक-६, पोलिस-५, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण-५. अशा एकूण १११ जणांना आज पालकमंत्री राणेंच्या हस्ते नियुक्तिपत्र देण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.