कोकण

टाळे

CD

-ratchl132.jpg
25N96281
ः चिपळूण ः राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारताना काँग्रेसचे पदाधिकारी.
---
...तर महामार्ग विभागाच्या कार्यालयास टाळे
चिपळुणात काँग्रेसची धडक ; अधिकाऱ्यांना धरले धारेवर, निकृष्ट कामांचा वाचला पाढा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ४ ः अनेक वर्षांपासून रखडलेली महामार्ग चौपदरीकरणाची कामे, निकृष्ट गटारे व फुटपाथच्या झालेल्या दुरवस्थेविषयी चिपळूण काँग्रेसने येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयावर शुक्रवारी धडक दिली. ठेकेदारांशी हातमिळवणी करून वेळकाढू भूमिका राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. येत्या १५ दिवसात कारभारात सुधारणा न झाल्यास कार्यालयास टाळे ठोकू व वेळ पडल्यास महामार्ग रोखू, असा इशाराही दिला.
काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग व तालुकाध्यक्ष लियाकत शहा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी अचानक राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयावर धडक दिली. या वेळी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या शाखा अभियंत्यांना धारेवर धरले. महामार्गाच्या दुतर्फा वाढलेली झाडी व गवत किती दिवसात काढली जाईल, असा सवाल करण्यात आला. याशिवाय गटारांची कामे निकृष्ट झाली आहेत. अनेक ठिकाणी गटारे कोसळली असून, फुटपाथवर चालणेही कठीण बनले आहे. उड्डाणपुलाचे काम अनेक महिने संथगतीने सुरू आहे. या कामासाठी यंत्रणा वाढवून तातडीने ते मार्गी लावण्याची मागणी यापूर्वी देखील केली होती; मात्र त्यानंतरही राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कारभारात सुधारणा झालेली नाही. दरवेळी नवीन अधिकारी कार्यालयात थांबवून इतर अधिकारी फिरतीवर निघून जातात. निवेदन दिल्यानंतर मी नवीन आहे. माहिती घेऊन सांगतो, अशी चालढकल करण्यात येते; मात्र यापुढे ही बनवाबनवी आम्ही चालवू देणार नाही. ठोस कार्यवाही झाली नाही तर जनतेला सोबत घेऊन आंदोलन छेडू.
राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांकडून केलेल्या सूचनांना ठेकेदारांकडून केराची टोपली दाखवली जाते. हे ठेकेदार अधिकाऱ्यांना दाद देत नसल्याचे दिसून येते. अधिकाऱ्यांचे व ठेकेदारांचे साटेलोटे असल्यानेच त्यांच्यावर कसलीही कारवाई होत नाही. वारंवार निवेदने देऊन त्याचा फरक पडलेला दिसत नाही. आता महामार्गावर आंदोलन करून थेट कृती करू, असा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला. या वेळी शहराध्यक्ष संतोष सावंतदेसाई यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
-----
कार्यवाहीकडे लक्ष
अनेक वर्षांपासून रखडलेली महामार्ग चौपदरीकरणाची कामे, निकृष्ट गटारे व फुटपाथच्या झालेल्या दुरवस्थेविषयी चिपळूण काँग्रेसने येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयावर शुक्रवारी धडक देत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. आता संबोधित विभाग काय कार्यवाही करतो याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

Latest Marathi News Live Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT