96440
कणकवलीत देवतरंगांचे सीमोल्लंघन
चतुःसीमा भेटी; ठिकठिकाणी देवतरंगांचे स्वागत, पूजन
कणकवली, ता. ४ ः दसरा सणानंतर कणकवलीच्या ग्रामदेवतांचे तरंग चतुःसीमांच्या भेटीसाठी जात आहेत. या देवतरंगांचे कणकवली शहरात ठिकठिकाणी स्वागत आणि पूजन केले जात आहे. आज शहरातील रवळनाथ मंदिर ते माऊली देवस्थान, कलमठ हद्दीवरील महापुरुष देवस्थानांना देवतरंगांनी भेट दिली.
शहराच्या प्रथेप्रमाणे ग्रामदैवत असलेल्या श्रीदेव स्वयंभू रवळनाथ मंदिरातील देवतरंगांसह मानकऱ्यांनी आज गाव वेशीवरील मंदिरात भेट देण्यासाठी पायी वारी सुरू केली. यात सर्वप्रथम शहरातील पटकीदेवी मंदिरात देवतरंगांचे आगमन झाले. यावेळी ढोल-ताशा, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. पटकीदेवी मंदिरातून बाजारपेठेतील झेंडा चौक येथील नांदरूकी आणि त्यानंतर कणकवली-कलमठ हद्दीवरील महापुरुष मंदिरात देवतरंग भेटीचा कार्यक्रम रंगला होता. यात बाजारपेठेत ठिकठिकाणी या देवतरंगांचे पूजन करण्यात आले. तसेच पुष्पवृष्टी, पाद्यपूजन करून स्वागत करण्यात आले. यावेळी अनेक व्यापारी, विक्रेते, स्थानिक रहिवाशांनी देवतरंगांच्या स्वागतासाठी तोरणेही उभारली होती. महापुरुष मंदिरातील भेटीनंतर गडनदीलगतच्या गाडादेवी मंदिर आणि तेथून वरचीवाडी येथील नदीपात्रातील माऊली देवस्थानाला देवतरंगांनी भेट दिली. या दरम्यान नाथ पै नगर, कनकनगर, शिवशक्तीनगर, वरचीवाडी, बांधकरवाडी, मधलीवाडी येथील नागरिकांनी देवतरंगांचे स्वागत आणि पूजन केले. यावेळी ठिकठिकाणी सडा रांगोळी काढून तोरणे उभारण्यात आली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.