rat5p2.jpg-
96579
डॉ. प्रशांत परांजपे, दापोली.
वसा वसुंधरा रक्षणाचा.........लोगो
इंट्रो
वायु प्रदूषण विविध प्रकारे होत असते. वाहनांची पडताळणी न केल्यामुळे होणाऱ्या वायू उत्सर्जनातून, तसेच विविध उद्योगांच्या माध्यमातून बाहेर पडणारा धूर, कचरा साक्षरता नसल्यामुळे जागोजागी प्लास्टीकसहित सर्व प्रकारचा कचरा जाळल्यामुळे होणारे प्रचंड प्रदूषण, अनेक वेळा अनेक दुर्घटनांमधून लागणाऱ्या आगीच्या माध्यमातून होणारे प्रदूषण आणि वर्षभर चालणारे विविध कार्यक्रम,विजयोत्सव, आनंद उत्सव आणि प्रामुख्याने दीपोत्सवामध्ये प्रचंड प्रमाणात फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे वायू प्रदूषणात अधिक भर पडत असते. हे टाळणे आणि कमीत कमी प्रदूषण कसे होईल याकडे कटाक्ष ठेवणे वसुंधरेच्या रक्षणार्थ आता अनिवार्य गोष्ट झाली आहे.
- डॉ. प्रशांत परांजपे. दापोली.
---------
वायु प्रदूषण टाळणे काळाची गरज
वायु प्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे याची अनेक कारणे आहेत. रासायनिक कंपन्या आणि भट्टी यातून निघणारा प्रक्रिया न केलेला वायू किंवा धूर, वाहनांची तपासणी पडताळणी वारंवार न केल्याने ध्वनी आणि वायूचे होणारे प्रदूषण, कचरा साक्षरतेच्या अभावामुळे अनेक ठिकाणी प्लास्टीकसहित मिश्र कचरा जाळल्यामुळे होणारे धूर आणि वास अर्थात वायू प्रदूषण, विविध अपघातांमध्ये लागणाऱ्या आगीमुळे होणारे प्रदूषण आणि प्रामुख्याने दिपोत्सवामध्ये प्रचंड प्रमाणात फटाके फोडल्यामुळे अवघ्या देशभर अधिक प्रमाणात होणारे वायू प्रदूषण, ही वायू प्रदूषणाची अनेक कारणे आहेत.
चांगलं काय आणि वाईट काय ,चूक काय आणि बरोबर काय, आरोग्याला हानिकारक काय आणि आरोग्यदायी काय, या सामान्य गोष्टींचा विचार प्रत्येक नागरिकाने केला तर वसुंधरेला सुजलाम सुफलाम राखण्यास कोणतीच अडचण येणार नाही. मात्र हीच समज नसणे दुर्दैवाने हीच मोठी अडचण आहे. आनंद उत्सव साजरा करायचा म्हटला की फटाके फोडल्याशिवाय त्याची पूर्तताच होत नाही असा एक मोठा गैरसमज सर्व दूर पसरलेला दिसून येतो. लग्न समारंभ, मिरवणुका, विजय उत्सव आणि दिवाळी सण यामध्ये आतताईपणे फटाक्यांचा वापर केला जातो .यामुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण होतेच, पण मानवी आणि निसर्गाच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम झालेला वारंवार दिसून येतो आहे.
याबाबतीत प्रतिवर्षी दिवाळी जवळ आल्यानंतर शासनस्तरावर, न्यायालयीनस्तरावर अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. बंदी आदेशाचा वापर केला जातो. मात्र तोपर्यंत फटाका निर्मितीचा कालावधी संपून गेलेला असतो. दुसरीकडे शासनानं वसुंधरेच्या रक्षणार्थ पंचमहाभूतांना प्रमाण मानून पृथ्वी, आप, तेज, वायू, अग्नी या सर्व गोष्टींवर संतुलन साधण्याकरता विविध कृती कार्यक्रमांची आखणी केली आहे. यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी फटाका विक्री आणि फटाका वाजवण्यावर बंदी घालणं आवश्यक असल्याचे निर्देश केले आहेत.
या निर्देशांमुळे ज्या विभागांमध्ये नगरपालिका ,महानगरपालिका किंवा ग्रामपंचायती कार्यक्षेत्रांमध्ये माझी वसुंधरा अभियान सुरू आहे त्या ठिकाणी व्यापारी आणि स्थानिक प्रशासन यांच्यामध्ये वाद निर्माण होत असल्याचे चित्र दिसून आले आहे. व्यापाऱ्यांना पूर्वीच निरंतर काळाकरता किंवा काही कालावधी करता फटाका विक्रीचे प्रमाणपत्र (लायसन) शासनानेच दिले आहे. असे असताना स्थानिक स्वराज्य संस्था या व्यापाऱ्यांना गावात फटाका विक्री करू नका असा कायदा नियम दाखवते. यामुळे येथे वादाची ठिणगी पडते.
व्यापारी आणि स्थानिक स्वराज्य संस्था आपापल्या जागेवर ठाम आणि बरोबर असले तरी देखील सामंजस्य आणि मानवी आणि निसर्ग आरोग्य रचना करता एक एक पाऊल पुढे आणि मागे टाकणं आवश्यक आहे. माझी वसुंधरा अभियानात नक्की याबाबत काय सांगितलं आहे ते जाणून घेणे आवश्यक आहे. माझी वसुंधरा'' अभियानांतर्गत हवा प्रदूषण कमी करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी फटाके विक्री आणि वापरावर बंदी घालण्यासाठी ठराव करून अधिसूचना जारी करणे अपेक्षित आहे, तसेच नागरिकांनी कमी आवाज करणारे व कमी प्रदूषण करणारे फटाके वापरावेत. या अभियानात हवा आणि वायू प्रदूषणाला आळा घालणे हा एक महत्त्वाचा उद्देश आहे.
* माझी वसुंधरा अभियानांतर्गत फटाके बंदीची कारणे ः
- प्रदूषण नियंत्रण ः फटाक्यांमुळे हवा आणि वायू प्रदूषण वाढते, जे पर्यावरणासाठी हानिकारक आहे.
- पंचतत्वांचे संरक्षण ः हे अभियान निसर्गाच्या पंचतत्वांवर (भूमी, जल, वायू, अग्नी, आकाश) आधारित आहे. फटाक्यांमुळे वायू प्रदूषण होते, त्यामुळे या अभियानांतर्गत ते कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.
* स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका:
- बंदी घालण्याचे आदेश ः ''माझी वसुंधरा'' अभियानांतर्गत, स्थानिक स्वराज्य संस्थांनी (जसे की महानगरपालिका, नगरपालिका,नगरपंचायत,ग्रामपंचायती) फटाके विक्री व वापराला बंदी घालण्यासाठी ठराव करून अधिसूचना जारी करणे आवश्यक आहे.
- नागरिकांना आवाहन ः पालिका प्रशासनाकडून नागरिकांना कमी आवाजाचे आणि कमी प्रदूषण करणारे फटाके वापरण्याचे आवाहन केले जाते. फटाके का फोडू नयेत याच्या काही दुर्दैवी घटनांचा अभ्यास करणे देखील आवश्यक आहे.
फटाके फोडल्यामुळे सर्वाधिक वायू प्रदूषण झालेले शहर म्हणून दिल्ली अनेकदा ओळखले जाते. दिवाळीच्या काळात, अनेकदा बंदी असूनही मोठ्या प्रमाणात फटाके फोडल्यामुळे दिल्लीतील हवेची गुणवत्ता अत्यंत खालावते आणि हवेतील प्रदूषकांचे प्रमाण धोकादायक पातळीवर पोहोचते. मुंबई आणि गुरुग्रामसारख्या इतर शहरांमध्येही फटाके फोडल्यामुळे हवेची गुणवत्ता खालावल्याच्या घटना घडतात.
दिवाळीसारख्या सणांमध्ये फटाके उडवण्याची परंपरा ही आनंददायी क्रिया म्हणून पाहिली जाते. तथापि, फटाक्यांचे मानवी आरोग्यावर आणि पर्यावरणावर होणारे हानिकारक परिणाम ओळखणे आवश्यक आहे.
* फटाके जाळणे हानिकारक का आहे.?
फटाके जाळल्याने हवेत मोठ्या प्रमाणात प्रदूषक पदार्थ बाहेर पडतात. या प्रदूषकांमध्ये कणयुक्त पदार्थ, सल्फर डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साईड, आणि विविध जड धातू. या प्रदूषकांना श्वास घेतल्याने श्वसनाच्या समस्या उद्भवू शकतात, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि दमा आणि ब्राँकायटिस सारख्या विद्यमान आरोग्य समस्या वाढवतात. मुले, वृद्ध आणि आधीच अस्तित्वात असलेल्या आरोग्य समस्या असलेल्या व्यक्ती या हानिकारक परिणामांना विशेषतः असुरक्षित असतात.
फटाक्यातील इतर घटकांचाही अभ्यास करणे आवश्यक आहे.
- पोटॅशियम नायट्रेट ः ऑक्सिडायझर म्हणून काम करते आणि फटाक्याचे ज्वलन टिकवून ठेवण्यासाठी ऑक्सिजन तयार करते.
- गंधक : प्रज्वलन आणि बर्न प्रक्रियेत मदत करते.
- कोळसा : इंधन स्रोत म्हणून काम करते.
- अल्युमिनियम : तेजस्वी चमक आणि स्पार्क तयार करण्यासाठी वापरले जाते.
- बेरियम नायट्रेट : हिरवे रंग तयार करते.
- स्ट्रॉन्टियम नायट्रेट : लाल रंग तयार करतो.
- तांबे संयुगे : निळ्या रंगाची छटा तयार करा.
ही रसायने, जळल्यावर, विषारी धुके सोडतात जे वायू प्रदूषणात योगदान देतात आणि आरोग्यास गंभीर धोका निर्माण करतात.
दिवाळी आल्यानंतरच फटाक्यांचा विषय प्रामुख्याने बोलला जातो असे टीकाकार म्हणतात टीकाकारांचे मत रास्त आहे. कारण दिवाळीतच सर्वाधिक फटाके फोडले जातात किंबहुना त्याचं प्रमाण हे वर्षभर विविध कार्यक्रमांमध्ये फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांच्या तुलनेत काही पटीने अधिक असते.
फटाके मोठ्या आवाजातले फोडल्यामुळे कर्णबधिरता येणे या घटना अगदी आपल्या तालुक्यात ,जिल्ह्यामध्ये, गावामध्ये आसपास सातत्याने घडत असतात पण तरी देखील आपण शहाणे होत नाही. पृथ्वीचा विनाश विविध बाजूंनी सुरू असतानाच आणि आपल्याच बांधवावर अनेक संकटे कोसळली असतानाच फटाक्यांचा धूर आणि प्रचंड ध्वनी प्रदूषण करून आपण काय साध्य करणार आहोत याचा सारासार विचार प्रत्येकाने करणं अत्यावश्यक आहे. कारण फटाका हा केवळ पैशाचा अपव्यय , ध्वनीचे प्रदूषण ,वायूचे प्रदूषण आणि एकंदरीतच पृथ्वीच आयुष्य कमी करण्यासाठी अतिशय पूरक असल्याचा निष्कर्ष अभ्यासक आणि वैज्ञानिक आणि पर्यावरण तज्ञांच्या मतानुसार स्पष्ट झाला आहे.
दीपोत्सवामध्ये आनंद नक्कीच साजरा केला जावा. माझ्या आनंदोत्सवामुळे वसुंधरेसह इतरेजनाना त्रास होणार नाही. याचे भान ठेवून बेलाशक आनंद उत्सव साजरा करावा. फटाकांच्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषण होणार नाही आणि धुरामुळे वायू प्रदूषण होणार नाही. याकडे कटाक्ष ठेवून या वसुंधरेसाठी आणि मानवी आरोग्यासाठी दीपोत्सव आनंदात घालवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील राहणं अत्यावश्यक आहे.
(लेखक शाश्वत पर्यावरणाचा विकास या विषयातील डॉक्टरेट पदवीधर आहेत)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.