चिपळूण सहकारी पतसंस्थेच्या
नवदुर्गा ठेव योजनेला प्रतिसाद
एका महिन्यात १५ कोटींची वाढ
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ५ : चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे सर्वसामान्यांना बचतीची सवय लागावी, यासाठी विविध ठेव योजना लागू केल्या आहेत. नवरात्रोत्सवनिमित्त ''नवदुर्गा सुयश ठेव'' योजना घटनस्थापनेच्या दिवशी सुरू करण्यात आली. या योजनेत ठेवीला ९ टक्के टक्के व्याजदर ठेवला होता. या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून अवघ्या ९ दिवसांत ३ कोटी ६१ लाख रुपये संकलित झाले. तर सप्टेंबरमध्ये एकूण ठेवीत १५ कोटी ४ लाख रुपयांनी वाढ झाली आहे, अशी माहिती चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांनी दिली.
चिपळूण नागरी पतसंस्थेने ठेवीदारांना दिवाळीसाठी ६ ते ११ महिने मुदत ठेवींवर उत्तम ९.५५ टक्के व्याजदर देणार असल्याचे जाहिर केले आहे. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेची १९ ऑक्टोबर १९९३ रोजी झाली असून संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र आहे. संस्थेची सभासद संख्या १ लाख ४५ हजार१०१, भाग भांडवल ७८ कोटी ७९ लाख रुपये, स्वनिधी १७७ कोटी ५७ लाख, ठेवी १ हजार १८२ कोटी, कर्जे १ हजार १७ कोटी, पैकी प्लेज लोन ४०२ कोटी ९८ लाख, सोने कर्ज ३४८ कोटी ३० लाख, गुंतवणुका ३०० कोटी ७६ लाख रुपये, मालमत्ता ४० कोटी ५१ लाख, नफा मार्च अखेर २१ कोटी २ लाख रुपये, एकूण शाखा ५० असून या शाखांच्या माध्यमातून हा आर्थिक कारभार सुरू आहे.