rat5p9.jpg-
96594
साखरपा : टी स्टॉलचे उद्घाटन करताना आमदार शेखर निकम.
डेरवणमध्ये चक्रभेदीतर्फे
महिलेला टी स्टॉल
साखरपा, ता. ५ : साडवली येथील चक्रभेदी सोशल फाऊंडेशनतर्फे विधवा महिलेला टी स्टॉल देण्यात आला आहे. डेरवण हॉस्पिटलजवळ या स्टॉलसाठा जागा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे संबंधित महिलेला चरितार्थाचा पर्याय उपलब्ध झालेला आहे.
चक्रभेदी सोशल फाऊंडेशनतर्फे जिल्ह्यातील विधवा आणि एकल महिलांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून संस्थेतर्फे काही महिलाना टी स्टॉल देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. रत्नागिरी येथे या आधी काही महिलांना स्टॉल देण्यात आले आहेत. या उपक्रमांतर्गत डेरवण येथील दीपाली विचारे यांना टी स्टॉल सुरू करुन देण्यात आला आहे.
या स्टॉलबरोबरच दीपाली विचारे यांना चहा बनवण्यासाठीचे सर्व साहीत्यही दिले आहे. या स्टॉलचे उद्घाटन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेच्या संस्थापिका वैदेही सावंत यांच्याबरोबर श्रद्धा प्रसादे, रावसाहेब चौगुले, सीमा रेडिज हे उपस्थित होते.