कोकण

रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राद्वारे आजपासून नि:शुल्क योग अभ्यासक्रम

CD

रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राद्वारे
आजपासून नि:शुल्क योग अभ्यासक्रम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या येथील भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्रात रत्नागिरीकरांच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन १० दिवसीय निःशुल्क योग प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन केले आहे.
हे निःशुल्क योग शिबिर उद्यापासून (ता. ६) ते १६ ऑक्टोबर दरम्यान अरिहंत मॉल येथील तिसऱ्या मजल्यावर रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात होणार आहे. दररोज सायंकाळी ५.३० वाजता योगवर्ग होणार आहेत. याचा जास्तीत जास्त फायदा नोकरदार वर्गाला होऊ शकतो. सोबतच याचा आरोग्याच्या दृष्टीने फायदा स्त्रीयांना होऊ शकतो. त्यामुळे रत्नागिरी शहरातील विद्यार्थी, नोकरदार वर्ग, गृहिणी यांनी आरोग्य सुदृढ करणाऱ्या १० दिवसीय निःशुल्क योग प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावा. हा १० दिवसांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर सहभागीना प्रमाणपत्र देखील देण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त स्थानिक रत्नागिरीकरांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी केले आहे. नोंदणी https://forms.gle/6S6zrJ8jcUE5tU5C8 या लिंकवर करता येतील. अधिक माहितीसाठी योग प्रशिक्षक प्रा. अक्षय माळी यांच्याशी संपर्क साधावा.

Latest Marathi News Live Update: कोल्ड्रिफ सिरप (Batch No. SR-13) चा तात्काळ वापर थांबविण्याचे एफडीएचे आदेश

Hampi Tourism: फक्त 2 दिवसात हंपी एक्सप्लोर करायचंय? ही ठिकाणं नक्की पाहा!

INDW vs PAKW: ४,४,४ प्रतिकाने केलेली सुरुवात अन् मग ऋचाच्या आक्रमणाने केला शेवट; भारताचे पाकिस्तानसमोर मोठे लक्ष्य

Jayakumar Gore: रामराजेंचं प्रेम करायचं वय निघून गेलंय: पालकमंत्री जयकुमार गोरे; रणजितसिंहांकडे मैत्रीचा हात पुढे केला अन्..

अब मजा आयेगा ना भिडू! प्रियाचे खरे आई-वडील अखेर सापडलेच; खोटी तन्वी प्रतिमाला त्रास देताना रविराज स्वतः पाहणार, आजच्या भागात काय घडणार?

SCROLL FOR NEXT