दिव्यांग प्रमाणपत्रासाठी
देवरुखात आज शिबिर
संगमेश्वर ः विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा परिषदेतर्फे समग्र शिक्षा समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत औपचारिक कार्यात्मक शिबिराचे आयोजन सोमवारी (ता. ६) सकाळी १० वाजता देवरूख येथील ग्रामीण रुग्णालयात केले आहे. या शिबिरामध्ये ० ते १८ वयोगटातील ज्या दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व कार्ड यांची गरज आहे. अशा पात्र विद्यार्थ्यांना कार्ड मिळणार आहेत. या दिव्यांग विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनसाठी संबंधित शाळेतील शिक्षक, केंद्रीय विशेष शिक्षक, अंगणवाडी सेविका, संबंधित केंद्रातील आशा सेविका मदत करणार आहेत. ग्रामपंचायत येथे आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी युडीआयडी प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रांसह www.swavlambancard.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून नोंदणी केलेला अर्ज व पावती सोबत घेऊन ६ ऑक्टोबरला ग्रामीण रुग्णालय येथे उपस्थित राहावे.
-------------
ताम्हाने शिक्षण मंडळाचा
वर्धापन दिन उत्साहात
संगमेश्वर ः ताम्हाने शिक्षण मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त पंचक्रोशीतील सांगवे आणि आंबवली केंद्रामधील सर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. रत्नागिरी जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक विनय होडे यांचा संस्थाध्यक्ष अशोक अशोक सप्रे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. या वेळी संस्थेचे अध्यक्ष अशोक सप्रे, उज्ज्वला धामणस्कर उपस्थित होत्या.
------------------
माखजन-आरवली
रस्त्याची दुरवस्था
संगमेश्वरः तालुक्यातील माखजन-आरवली रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या गंभीर प्रश्नाकडे शासन सातत्याने दुर्लक्ष करत असल्या तीव्र शब्दात नाराजी व्यक्त होत आहे. माखजन-आरवली हा १० किमी अंतराचा रस्ता असून हा मुख्य रस्ता आहे. या रस्त्याला मोठी वर्दळ पाहायला मिळते. पावसाळा सुरू झाल्यापासून या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्याची डागडुजी योग्य प्रकारे सार्वजनिक बांधकाम विभागाने करावी अशी मागणी येथील ग्रामस्थ व वाहन चालकांकडून केली जात आहे.
---------
लोटे रोटरीतर्फे
आदर्श शिक्षक स्पर्धा
चिपळूण ः रोटरी इंटरनॅशनलने डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त देशभर आदर्श शिक्षक स्पर्धा आयोजित करण्याचे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर रोटरी क्लब लोटेने पंचक्रोशीतील शाळा, हायस्कूल व महाविद्यालयात जाऊन शिक्षकांचे परीक्षण करत आदर्श शिक्षकांचा गौरव केला. विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या अध्यापनाशी निगडित १० प्रश्नावलींचा संच देण्यात आला व त्याचे गुणांकन मुलांकडून घेण्यात आले. मुख्याध्यापकांनी त्यांच्या शिक्षकांचे गुणांकन घेतले व रोटरीचे स्वतःचे मूल्यमापन असे तीन टप्यात अगदी गुप्त पद्धतीने ही स्पर्धा घेण्यात आली. सर्वाधिक गुण प्राप्त आदर्श शिक्षकांना गौरविण्यात आले. यामध्ये घाणेखुंट शाळा नं. २ चे विनायक पडवळ, लोटेमाळ शाळा धर्मराज वाडकर, कविता विनोद सराफ हायस्कूलचे नितीन जाधव, गुणदे हायस्कूलचे कासार, आयुर्वेद कॉलेजचे निनाद साडविलकर, नर्सिंग कॉलेजचे शिवप्रसाद हलेमानी, कोतवली हायस्कूलचे महेश तांबे, कुंभार्ली शाळेचे विश्वास पेढांबकर, शिरगाव विद्यालयाच्या सुलक्षणा पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.