रंगशाळा विद्यालयात
अभिनय कार्यशाळा
रत्नागिरीः नाचणे रोड येथील रंगशाळा सिने-नाट्य विद्यालयातर्फे २४ ते २६ ऑक्टोबर या दिवाळी सुट्टीच्या दिवसात सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या वेळात सात वर्षावरील सर्वांसाठी अभिनय कौशल्य कार्यशाळा होणार आहे. कार्यशाळेत मंचाभिनय, कॅमेऱ्यासमोरील अभिनय तंत्र, सभाधीटपणा, संवाद कौशल्य, वाचिक अभिनय, उच्चारण, स्पष्टतेचे व्यायाम, आंगिक अभिनय, आवाजाची जोपासना, भूमिका अभ्यास, हावभाव, कल्पनाशक्ती, निरीक्षण क्षमता, स्टोरी बिल्डींग आदींचा समावेश आहे. सात वर्षावरील सगळ्यांनी सुट्टीचा फायदा घेऊन अभिनय कौशल्य कार्यशाळेत सहभागी व्हावे, असे आवाहन रंगशाळा विद्यालयाचे विभाग प्रमुख प्रदीप शिवगण यांनी केले आहे.
----------
श्रीराम मंदिरात
आज काव्य मैफल
रत्नागिरी ः कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सोमवारी (ता. ६) सायंकाळी साडेचार वाजता शहरातील रामआळी येथील श्रीराम मंदिरच्या प्रांगणातील श्री देवी तुळजाभवानी देवस्थान येथे मंदिर सभागृहात काव्य मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. या मैफलीत सर्व नामवंत व नवोदित कवीवर्यांनी तसेच चोखंदळ रसिकांनी अगत्यपूर्वक उपस्थित राहून मैफलीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन काव्य मैफल प्रमुख डॉ. दिलीप पाखरे यांनी केले आहे.
-----------
निवेंडीत आज
वर्षावास सांगता
रत्नागिरी ः बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा रत्नागिरी, संस्कार समिती आणि बौद्धजन पंचायत समिता शाखा १८ वरची निवेंडी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (ता. ६) लुबिनी बुद्ध विहारात वर्षावास सांगता धम्म प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील बौद्ध धम्मगुरु भदंत संघारज यांच्या विशेष धम्मदेसनेचे प्रवचन होणार आहे. यावेळी बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा रत्नागिरी अध्यक्ष प्रकाश पवार, उपाध्यक्ष विजय आयरे, चिटणीस सुहास कांबळे, शशिकांत कांबळे, कोषाध्यक्ष मंगेश सावंत, संस्कार समिती सभापती संजय आयरे, रविकांत पवार आदी उपस्थित राहणार आहेत.