96686
व्हॉलीबॉल स्पर्धेत डॉ. सामंत प्रशाला विजेती
मालवण : क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्या वतीने पोईप हायस्कूलच्या मैदानावर आयोजित तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत अखिल देवबाग विकास मंडळ मुंबई संचालित डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबाग प्रशालेच्या बालगट मुलांच्या संघाने लक्षवेधी कामगिरी करत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. हा संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. प्रशालेच्या संघाने जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी प्रथमच पात्र होण्याची ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. या विजयी संघात ओंकार कुमठेकर (कर्णधार), नेहाल राऊळ, ऋषभ खराडे, वेदांत घाटवळ, आरव कोळंबकर, अर्विन परीकर, सार्थक सारंग, आयुष गोवेकर, कौस्तुभ चोपडेकर आणि दर्श चोपडेकर या खेळाडूंचा समावेश आहे. या सर्व खेळाडूंना श्री. घेवडे यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे प्रशालेच्या मुख्याध्यापिका रचना खोबरेकर आदींनी अभिनंदन केले.
---
96645
सुकळवाड ठाकरवाडीत ग्रामस्वच्छता मोहीम
मालवण : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत सुकळवाड ठाकरवाडी येथे लोकसहभागातून ग्रामस्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या विशेष स्वच्छता मोहिमेत ठाकरवाडी येथील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरीच्या आवाराची स्वच्छता आणि ठाकरवाडी अंगणवाडी आवाराची स्वच्छता करण्यात आली. स्वच्छतेचा संदेश देत ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेऊन श्रमदान केले. या अभियानात ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांनी मिळून परिसर स्वच्छ केला. यावेळी सरपंच युवराज गरुड, उपसरपंच किशोर पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य प्रमिला पाताडे, ग्रामपंचायत अधिकारी वेदिका गोसावी, अंगणवाडी सेविका संजना कुशे, केंद्रचालक रूपाली बिलिये, रोजगारसेवक प्रदीप पाताडे, सफाई कर्मचारी सुभाष म्हसकर, ग्रामपंचायत कर्मचारी अक्षय पाताडे, ग्रामस्थ पंढरी पाताडे, हेमंतकुमार पाताडे आणि इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून लोकसहभागातून ही मोहीम यशस्वी केली.
---
सांगवे दिर्बादेवीचा उत्सव मंगळवार पर्यंत
कनेडी : सांगवे -भिरवंडे गावचे श्रद्धास्थान माहेरवशींच्या हाकेला धावणारी दिर्बादेवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव यंदा ७ ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार आहे. दसऱ्या दिवशी शिमोलग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवार ३ ऑक्टोंबर पासून देवीच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू झाला. भाविकांच्या नवसाला पावणाऱ्या या दिर्बादेवीला आतापर्यंत अनेक भाविकांनी भेट देऊन देवीचे दर्शन घेतले आहे. खणा नारळाच्या ओटीसह साडी, सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम दान करून भाविकांनी देवी मातेचा आशीर्वाद घेतले आहेत. देवीच्या या वार्षिक उत्सवाला दिवसेंदिवस शेकडो भाविक हजेरी लावत आहेत. साधारण दुपारी अडीच वाजल्यापासून सायंकाळी उशिरापर्यंत देवीच्या ओटी भरण्याच्या कार्यक्रम होतो. याच वेळी भाविक देवीला बोललेला नवस पूर्ण करत असतात, मंदिराच्या परिसरामध्ये विविध वस्तू, मालवणी खाद्यपदार्थ आणि ओटीचे साहित्य ही उपलब्ध आहे.
----
96639
संयोजकपदी विराज परब यांची निवड
बांदा ः भाजप बांदा मंडळाच्या सोशल मीडिया संयोजकपदी विराज परब यांची निवड करण्यात आली. जिल्हा संयोजक श्रीकृष्णा परब यांच्या पत्रकाद्वारे ही निवड जाहीर करण्यात आली. परब हे गेल्या काही काळापासून पक्षाच्या विविध उपक्रमांत सक्रिय सहभाग नोंदवत असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाची भूमिका व कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे सातत्याने काम करत आहेत. बांदा मराठा समाजाचे ते अध्यक्ष आहेत. त्यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. या नियुक्तीचे पत्र जाहीर करताना जिल्हा संयोजक परब यांनी विराज परब यांना शुभेच्छा देत, त्यांच्या कार्यकाळात सोशल मीडिया विभाग अधिक सक्षम व प्रभावी होईल, असा विश्वास व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.