कोकण

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे सावंतवाडी शहरात संचलन

CD

96714

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे
सावंतवाडी शहरात संचलन

सावंतवाडी, ता. ५ ः शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने शताब्दी वर्षा निमित्ताने विजयादशमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने संघ स्वयंसेवकांकडून शहरातून संचलन तसेच शस्त्रपूजन करण्यात आले.
विजयादशमीच्या निमित्ताने शहरातून भव्य पथसंचलन केले. तसेच शस्त्रपूजन देखील करण्यात आले. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी १९२५ ला विजयादशमीच्या दिवशी हिंदू समाजाचे संघटन करून राष्ट्राला परमवैभवाप्रत नेण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली होती. यास १०० वर्ष पूर्ण झाली असून संघ शताब्दी वर्षांच्या निमित्ताने कळसुलकर इंग्लिश स्कूल येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख वक्ते सुहास पोतदार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. संघशताब्दी पर्वात पर्यावरण, समरसता, कुटुंब प्रबोधन, नागरी कर्तव्य आणि ‘स्वबोध’ या पाच महत्त्वाच्या बिंदूंच्या आधारावर सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी सर्व स्वयंसेवक कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. तसेच विजयादशमीचा उत्सव आणि संचलन यातून संघाचे एक आश्वासक, कल्याणकारी आणि सज्जनशक्तीचे रूप समाजासमोर येते, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सावंतवाडी तालुका कार्यवाह किशोर वामन नांदिवडेकर, प्रथमेश आठलेकर आदी उपस्थित होते.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

World Cup 2025: भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर हस्तांदोलन केलं की नाही? सामन्यानंतर काय घडलं जाणून घ्या

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

Crime: पक्षातील सदस्याला अडकवण्यासाठी घरात स्फोटके आणि दारू ठेवली, पण काँग्रेस नेता स्वत:च अडकला अन्...; काय घडलं?

SCROLL FOR NEXT