कोकण

पुरुषोत्तम करंडक प्राथमिक फेरीत सात एकांकिका सादर होणार

CD

पुरुषोत्तम करंडक प्राथमिक फेरीत
सात एकांकिका सादर होणार
रत्नागिरी, ता. ५ : महाराष्ट्रीय कलोपासक (पुणे) या संस्थेतर्फे आयोजित पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा ८ ऑक्टोबरला स्वा. सावरकर नाट्यगृहात होणार आहे. या प्राथमिक फेरीमध्ये सात एकांकिका सादर होणार असून त्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. सकाळी ११ वाजता पहिली एकांकिका सुरू होईल व शेवटची एकांकिका सायंकाळी ६ वाजता सुरू होणार आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नाट्यगुणांना सकस व्यासपीठ मिळावे, या हेतूने गेली ५९ वर्षे, ‘पुरुषोत्तम करंडक’ आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा होत आहे. यंदा स्पर्धेचे ६० वे वर्ष आहे. सन २०१० पासून ही स्पर्धा, कोल्हापूर, जळगांव, रत्नागिरी आणि नागपूर या केंद्रांवर होत आहे. या वर्षी ही स्पर्धा ८ ऑक्टोबरला स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात होणार आहे. या एकांकिका स्पर्धेमध्ये तीन जिल्ह्यांतील वरिष्ठ महाविद्यालयीन संघ सहभागी होणार आहेत.
पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेचे वेळापत्रक- सकाळी ११ वाजता पैठणी- भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालय, १२ वाजता- तुकारामाची टोपी- फिनोलेक्स अॅकॅडमी, दुपारी २ वाजता विनाअनुदानित- सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च, दुपारी ३ वाजता जाळ्यातील खिळे- मत्स्य महाविद्यालय शिरगाव, सायंकाळी ४ वाजता ठोंग्या- फिनोलेक्स अॅकॅडमी, सायंकाळी ५ वाजता- श्यामची आई- उद्यानविद्या महाविद्यालय दापोली आणि सायंकाळी ६ वाजता काहीतरी अडकलंय- डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय महाड.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

World Cup 2025: भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर हस्तांदोलन केलं की नाही? सामन्यानंतर काय घडलं जाणून घ्या

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

Crime: पक्षातील सदस्याला अडकवण्यासाठी घरात स्फोटके आणि दारू ठेवली, पण काँग्रेस नेता स्वत:च अडकला अन्...; काय घडलं?

SCROLL FOR NEXT