rat६p२.jpg-
25N96776
रत्नागिरी : आगाशे विद्यामंदिरात शारदोत्सवानिमित्त आयोजित स्पर्धांमधील विजेते विद्यार्थी. मागे उभे मान्यवर.
आगाशे विद्यामंदिरात बक्षीस वितरण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ : भारत शिक्षण मंडळाच्या कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरामध्ये शारदोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. सांगतेच्या दिवशी विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले.
बक्षीस वितरण कार्यक्रमाला शाळा समिती अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, शाळा प्रबंधक विनायक हातखंबकर, शीतल काळे, सुनीता कुलकर्णी, मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम व शिक्षक, शिक्षक-पालकसंघाचे प्रतिनिधी व पालक उपस्थित होते. या कार्यक्रमात शाळेमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शाळेतील योगशिक्षिका स्वाती मलुष्टे, शिक्षिका प्रीती देवरूखकर, तिर्था कोकजे आणि संगणक शिक्षिका मनस्वी तांदळे यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. पालकांसाठी आयोजित विविध स्पर्धांचे बक्षीस वितरणही यावेळी करण्यात आले.
चौकट
स्पर्धानिहाय विजेते विद्यार्थी ः
इ. चौथी- नाट्यछटा स्पर्धा- प्रथम ओवी गाठे (राणाप्रताप), द्वितीय शांभवी सनगरे (छत्रपती शिवाजी), तृतीय विभागून -स्वरा मोंडकर, ओवी राऊत (राणी लक्ष्मीबाई), उत्तेजनार्थ-रिया काजरेकर (छत्रपती शिवाजी), श्रीपाद भिडे (राणाप्रताप). इ. दुसरी नाट्यछटा स्पर्धा- प्रथम मयुरेश पाटील (मुक्ताई), द्वितीय रुद्रानी मुळ्ये (ज्ञानेश), तृतीय विभागून-अनुष्का नानिवडेकर (ज्ञानेश), हर्ष हातखंबकर (मुक्ताई), उत्तेजनार्थ- रूही पनोरकर, दुर्वा पवार (निशिगंध). इ. तिसरी- नाट्यछटा स्पर्धा प्रथम- सार्थक ढवळ (ध्रुव), द्वितीय-गंधर्व पाध्ये (एकलव्य), तृतीय दुर्वा बंडबे (प्रल्हाद), उत्तेजनार्थ-धृती फाटक (एकलव्य), उत्तेजनार्थ- स्वरूप नेवरेकर (ध्रुव), विशेष वेशभूषा- जिजामाता तिर्था जाधव (एकलव्य).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.